विश्‍वास नांगरे-पाटील यांचा शहरातील मान्यवरांशी संवाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - जनतेला पोलिसांकडून काय अपेक्षा आहेत, त्याचा अग्रक्रम काय आहे, हे जाणून घेण्यासाठी शहरातील विविध स्तरांतील मान्यवरांशी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी संवाद साधला. पोलिस अधीक्षक कार्यालयात सायंकाळी ही संवाद बैठक झाली. 

कोल्हापूर - जनतेला पोलिसांकडून काय अपेक्षा आहेत, त्याचा अग्रक्रम काय आहे, हे जाणून घेण्यासाठी शहरातील विविध स्तरांतील मान्यवरांशी थेट विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी संवाद साधला. पोलिस अधीक्षक कार्यालयात सायंकाळी ही संवाद बैठक झाली. 

श्री. नांगरे-पाटील म्हणाले, ""सध्या पोलिस आणि समाजात दुरावा निर्माण झाला आहे. नागरिक पोलिसांच्या कामात सहकार्य करत नाहीत. त्यांची मदत मिळाल्यास अनेक गुन्ह्यांची उकल होऊ शकते. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना अडचणी येणार नाहीत. पोलिस व नागरिक यांच्यात संवाद घडावा या उद्देशाने ही बैठक बोलावली आहे. पोलिस व नागरिक यांचा संवाद ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून ते एकमेकांच्या नेहमी संपर्कात राहतील.'' 
 

यानंतर मान्यवरांकडून पोलिस ठाण्यात पोलिसांकडून चांगली वागणूक मिळत नाही, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष नाही, मारामाऱ्यांसह अवैध व्यवसायाची नागरिकांना माहिती असते; मात्र ते ती पोलिसांना देण्यास घाबरतात, जिल्ह्यातील चोरीचे प्रमाण, छेडछाड व शोषणाच्या विरोधात महिला तक्रार देण्यासाठी निर्भीडपणे पुढे येत नाहीत, अशा विविध तक्रारी मांडण्यात आल्या. तसेच संवाद उपक्रमातून नागरिक व पोलिस यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, अशा प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आल्या. 
 

बैठकीस आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, पोलिस निरीक्षक अनिल देशमुख, जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. विवेक घाटगे, निवास साळोखे, बाबा पार्टे, अशोक रोकडे, बंकट थोडगे, सुनील मोरे, कल्याणी कुलकर्णी, वैशाली राजशेखर, तसेच मिलिंद धोंड आदी उपस्थित होते. 

Web Title: Nangare-Patil in dialogue with veterans