नागनाथ यात्रेतील कुस्ती स्पर्धेत पै. समाधान पाटील अव्वल

चंद्रकांत देवकते
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील नागनाथ यात्रेत झालेल्या कुस्ती स्पर्धा मध्ये पै. समाधान पाटील यांने प्रतिस्पर्धी  पै.अमितकुमार यावर मात करून रोख एक लाख एक हजार रुपयाचे इनाम व चांदीची गदा पटकाविली.  

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील नागनाथ यात्रेत झालेल्या कुस्ती स्पर्धा मध्ये पै. समाधान पाटील यांने प्रतिस्पर्धी  पै.अमितकुमार यावर मात करून रोख एक लाख एक हजार रुपयाचे इनाम व चांदीची गदा पटकाविली.  

मुंबई महापौर केसरी व महाराष्ट्र चॅम्पियन विजेता पैलवान समाधान पाटील नजिक पिंपरी (मोहोळ) विरुद्ध कोल्हापूर केसरी अमित कुमार दिल्ली (कोल्हापूर) यांच्यात मोहोळ येथील श्री नागनाथाच्या यात्रेत निकाली लढत झाली. या रोमहर्षक लढतीत पैलवान समाधान पाटील याने दिल्लीच्या अमितकुमार  यांस पायगिस्सा  डावावर आस्मान दाखविले .व  कै वस्ताद नागनाथ बारसकर यांच्या स्मरनार्थ ठेवलेले प्रथम नगराध्यक्ष केसरी २०१८ चे  नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी ठेवलेले १ लाख १ हजार रुपयांचे रोख बक्षिस व चांदीची गदा पटकावली.

श्री नागनाथ यात्रेनिमीत्त देवस्थान पंचकमेठीच्या वतीने  सालाबादप्रमाणे  सोमवार ता .२३ रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजीत  केले होते . याचे उदघाटन नगराध्यक्ष रमेश बारसकर यांचे हस्ते झाले . तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक लहान मोठे  पैलवान या ठिकाणी कुस्त्यासाठी उपस्थीत राहीले होते. या कुस्तीच्या  मैदानात द्वितीय क्रंमाकाची कुस्ती दिल्लीच्याच रमेश कुमार विरूद्ध मोहोळ तालुक्यातील ढोक बाभुळगांव येथील नंदकुमार काकडे यांच्यात होऊन काकडे यांने ती  निकाली डावावर जिंकली . तर तृतीय कुस्ती अंकुश बंडगर विरुद्ध माऊली राऊत यांच्यात होऊन बंडगर विजयी झाले. यावेळी देवस्थान पंचकमेटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व विश्र्वस्थ, प्रतिष्ठीत नागरिक, यांच्यासह सुमारे दहा हजार कुस्ती शौकीनांचा समुह यावेळी उपस्थित होता. कुस्तीसाठी पंच म्हणुन चंद्रकांत काळे, भिमराव मुळे, पद्माकर देशमुख, राधेशाम गायकवाड, बाळासाहेब रावसाहेब देशमुख, अविकाका गायकवाड, हणमंत वाघमोडे, बाळू नकाते  यांनी काम पाहिले. तर समालोचन अशोक धोत्रे सर यांनी केले.

Web Title: nangnath yatra wrestling competition samadhan patil wins