‘अंनिस’वालों, जवाब दो..!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

सांगली - ‘अंनिस’चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संस्थांना टार्गेट का केले जात आहे? डॉ. दाभोलकरांचे हत्यारे पकडायची तुमची मागणी आहे की हिंदुत्ववादी संस्था बंद पाडण्याची? ‘अंनिस’वालों, जवाब दो, अशी घोषणा देत आज विविध हिंदुत्ववादी संघटनांनी निदर्शने केली. हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकाराने आंदोलन झाले.  

येथील मारुती चौकात हातात फलक, भगवे ध्वज घेऊन घोषणा देण्यात आल्या. त्यात गो-रक्षा समितीचे अंकुश गोडसे, सनातन संस्थेचे राजाराम रेपाड, हिंदू जनजागृती समितीचे संतोष देसाई, शिवप्रतिष्ठानचे सचिन पवार आदी सहभागी झाले. श्री. रेपाड यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘अंनिस पुरोगामी, समाजवादी, डाव्यांचा बुरखा घालून हिंदुत्वाच्या विरोधात काम करत आहे. हिंदुत्ववाद्यांना संपवण्याचा त्यांचा डाव आहे. हे सरकारही पुरोगाम्यांच्या तालावर नाचणारे आहे. डॉ. दाभोलकरांचा खून करणाऱ्यांना पकडा, ही यांची मागणी नाही. त्यांचा रोख हिंदुत्ववादी संघटनांकडेच आहे. या खुनामागील अन्य कारणांच्या दिशेने शोध घेतला जात नाही. 

‘अंनिस’च्या लाखो रुपयांच्या निधीमध्ये घोटाळा आहे. तेही कारण असू शकते. हे सोडून सनातनविरुद्ध द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. त्याचे उत्तर ‘अंनिस’ला द्यावे लागेल.’’

Web Title: Narendra Dabholkar Murder Case Anis jawab Do Agitation