कर्नाटक पोलिसांमुळेच ‘सीबीआय’ची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

सांगली - डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने महाराष्ट्रात केलेली ताजी कारवाई कर्नाटक पोलिसांच्या तपासाच्या दबावापोटी असल्याची टीका करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने आज डॉ. दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनाच्यानिमित्ताने येथील जुने स्टेशन चौकात महात्मा गांधी पुतळ्यासमोर विविध पुरोगामी कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. गेली चार वर्षे ‘अंनिस’ने हत्येच्या तपासासाठी दबाव कायम ठेवला आहे. आजही ‘जवाब दो’ आंदोलन झाले.

ॲड के. डी. शिंदे म्हणाले,‘‘ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक पोलिसांनी गतीने केला आहे. या तपासात अंदुरे, पांगारकर यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्यावर अटकेची कारवाई होणारच होती. त्याआधी सीबीआयची नाचक्की होऊ नये म्हणून कारवाईचे नाटक झाले आहे. 

आता या आरोपीकडे विध्वंसक शस्त्र साठा सापडला आहे. दाभोलकरांच्या हत्येत यांचा सहभाग होता हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. तपास यंत्रणापुढे ही सारी माहिती आधीच दिली होती. मात्र आंधळ्याचे सोंग घेतलेली यंत्रणा हलत नाही. हत्या करणारे हात बहुजनांमधील माथेफिरूंचे आहेत. मात्र त्यांच्या मागचा मेंदू सनातनी आहे. त्यांच्यापर्यंत पोलिस तपास जाईपर्यंत आपला लढा सुरुच राहील.’’

आंदोलनात चंद्रकांत वंचाळे, ज्योती आदाटे, उज्वला परांजपे, विजयकुमार जोखे, जनार्दन गोंधळी, तारा भवाळकर,. गौतमीपुत्र कांबळे, संजय निटवे, आर.बी.शिंदे, शाहीन शेख, इब्राहिम पेंढारी, जिशान पटेल, शंकर शेलार, सुहास पवार आदींनी भाग घेतला.

त्यांच्या मुलांना संत घोषित
राहुल थोरात म्हणाले,‘‘ सीबीआयने अटक केलेल्यांचा सारा 
पुर्वेइतिहास आम्ही त्यांच्या फेसबूक पोस्टमधून मिळवला आहे. या तथाकथित साधकांच्या कुटुंबाची जबाबदारी पुर्वीच सनातनने घेतली आहे. त्यांच्या मुलांना संत घोषित करण्यात आले आहे. कर्नाटक पोलिसांच्या दबावामुळेच ही कारवाई झाली आहे मात्र आता ती तोंडदेखली होऊ नये.’’

Web Title: narendra Dabholkar Murder Case Karnataka Police CBI Inquiry