मोदींनी सोलापुरात साडेचार मीटर तरी कापड घेतले का? - सुशीलकुमार शिंदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘आमची सत्ता आल्यास सोलापूरच्या यंत्रमागाचे कापड सैन्यासाठी घेतो. मोदी सत्तेत येऊन साडेचार वर्षे झाले त्यांनी सोलापुरातून साडेचार मीटर तरी कापड खरेदी केले का? असा सवाल माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला. 

मोदी मोठे नाटककार आहेत. त्यांच्या मोठ्या मोठ्या भाषणांना जनता बळी पडली असल्याचा टोलाही शिंदे यांनी लगावला. सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे पूर्व भागातील युवकांचा आणि युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा आज झाला, या वेळी आमदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, गटनेते चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा उपस्थित होते.

एकदा पाडले म्हणून बिघडले कुठे?
सोलापूरच्या जनतेने मला एकदा नव्हे तब्बल १२ वेळा निवडून दिले आहे. एकदा चूक घडली तर बिघडले कुठे? पराभवाच्या सहाव्या दिवसानंतर मी सोलापुरात पुन्हा काम चालू केले. या भागात मेघनाथ येमूल सारख्या युवा नेत्याचासुद्धा येथे पराभव झाला. परंतु, लोकशाहीत जय-पराजय होत असतो. पराभूत झाला म्हणून घरात बसणाऱ्यांपैकी आम्ही नाही. शेवटच्या श्‍वासापर्यंत जनतेचे काम करत राहणार. माझ्याप्रमाणेच आमदार प्रणिती शिंदे या मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून रात्रंदिवस जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी काम करत असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले. 

Web Title: Narendra Modi Solapur Cloth Sushilkumar Shinde Politics