फडणवीस, ठाकरेंकडून कौतुक अन्‌ खंतही - नरेंद्र पाटील

धामणी - कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांच्या सत्कारप्रसंगी सुभाष चव्हाण, डॉ. बाबूराव पाटील, विशाल पवार व अन्य.
धामणी - कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांच्या सत्कारप्रसंगी सुभाष चव्हाण, डॉ. बाबूराव पाटील, विशाल पवार व अन्य.

ढेबेवाडी - सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीला झालेल्या मोठ्या मतदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले असले, तरी सातारकरांनी जिल्ह्यात विकासासाठी परिवर्तन घडविण्यासाठी पूर्ण कौल न दिल्याने खंतही व्यक्त केल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. 

महामंडळाच्या अध्यक्षपदी निवडीनंतर त्या माध्यमातून राज्यभर केलेल्या उठावदार कामगिरीबद्दल धामणी (ता. पाटण) येथील श्री गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळाने श्री. पाटील यांचा सत्कार केला. श्री गणेश मंदिराच्या १५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ते म्हणाले, ‘‘मोठ्या अपेक्षेने सातारकर जनतेच्या विश्वासावर यावेळची लोकसभेची निवडणूक मी लढवली. दुर्दैवाने त्यात अपयश आले; परंतु साडेचार लाखांवर मतदारांनी विकासाच्या मुद्द्यांवर मतदान केले ही निश्‍चितपणे उल्लेखनीय व अभिमानास्पद अशीच बाब आहे. अवघ्या २० दिवसांच्या प्रचारात एवढे मोठे यश मिळणे हीच परिवर्तनाची खरी नांदी आहे.

देशाची ऐतिहासिक राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातही विकासासाठी परिवर्तन घडावे, अशी त्यांची इच्छा होती; परंतु येथील जनतेने विकास का नाकारला हे न उलगडणारे कोडे आहे. आम्ही माथाडी कामगारांच्या चळवळीतील माणसे पराभवांना घाबरत नाही. आतापर्यंत अनेक अपयशांना सामोरे गेलो; पण कधीच खचलो नाही. पुन्हा ताठमानेने आणि खंबीरपणे उभे राहात दुप्पट वेगाने परिस्थितीला सामोरे गेलो. या निवडणुकीत पराभव झाला असे मी कधीच मानणार नाही. माझ्यासाठी ही पुन्हा पाच वर्षे काम करण्याची संधी असून, संधीचे सोने केल्याशिवाय मी गप्प राहणार नाही.’’ 

कार्यक्रमास माथाडी हॉस्पिटलचे माजी वैद्यकीय समाजकल्याण अधिकारी डॉ. बाबूराव पाटील, मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, विशाल पवार, धनाजी सावंत, रमेश पाटील, विश्रांत सावंत, प्रल्हाद पाटील, आनंदराव सावंत, आनंदराव पाटील आदींसह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. 

विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सिद्धी चव्हाण हिने ‘आई’ या विषयावर केलेल्या भाषणाने वातावरण क्षणभर भारावून गेले होते. बाबूराव सावंत यांनी प्रास्ताविक केले. सुभाष चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. प्रकाश कुलकर्णी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com