गेंजगे आत्महत्या प्रकरणी नरेश हिंदुजाला अटक

गेंजगे आत्महत्या प्रकरणी नरेश हिंदुजाला अटक

कोल्हापूर - बांधकाम व्यावसायिक सुनील गेंजगे आत्महत्या प्रकरणातील संशयित सावकाराला शाहूपुरी पोलिसांनी आज अटक केली. नरेश गोपीचंद हिंदुजा (वय ४८, रा. गांधीनगर) असे त्याचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः सम्राटनगर येथील बांधकाम व्यावसायिक सुनील गेंजगे यांनी १३ नोव्हेंबर २०१८ रोजी विष घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांच्या नातेवाइकांनी फिर्याद दिली. त्यानुसार सहाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानुसार १७ नोव्हेंबरला शाहूनगर येथील उदय शेटके, उत्तम शेटके, उमेश शेटके या तिघांसह शैलेश पोवारला अटक केली. या प्रकरणातील संशयित हिंदुजा आणि बाळासाहेब ठमके या दोघांनी अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात दाखल केला होता.

हिंदुजाचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने २३ नोव्हेंबरला नामंजूर केला. त्यानंतर त्याला आज शाहूपुरी पोलिसांनी गांधीनगर येथून अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. संशयित ठमकेने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com