नृसिंहवाडी दत्त मंदिर पाण्याखाली; उत्सव मूर्ती नारायण स्वामी मठात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

नृसिंहवाडी - पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊसामुळे शिरोळ तालुक्‍यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पातळीत चौवीस तासात आज पाच ते सात फुटाने वाढ झाली. कृष्णा नदीपात्रात वाढ झाल्याने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे.

नृसिंहवाडी - पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊसामुळे शिरोळ तालुक्‍यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पातळीत चौवीस तासात आज पाच ते सात फुटाने वाढ झाली. कृष्णा नदीपात्रात वाढ झाल्याने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे.

मंदिरातील मंडप पाण्याखाली गेला आहे. मंदिर परिसरात असणाऱ्या राम मंदिराचा कळस दिसत आहे. देवस्थानच्या अन्न छत्राजवळ पुराचे पाणी आले आहे. मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे श्री ची उत्सव मूर्ती दर्शनासाठी नारायण स्वामी मठात ठेवली आहे. 

कुरूंदवाड अनवडी पूल, कुरूंदवाड-शिरढोण पूल, नृसिंहवाडी-औरवाड जुना पूल पाण्याखाली गेला आहे. कुरूंदवाड येथे वीटभट्टीत पूराचे पाणी आल्याने नुकसान झाले आहे. कुरूंदवाड पुलाजवळ पाण्याची पातळी 53 फुटापर्यंत गेली आहे. पूलाजवळ असणारे म्हसोबा मंदिर पाण्याखाली गेले आहे. कुरूंदवाड, नृसिंहवाडी सह परिसरातील नदीकाठलगत असणारी गवते, ऊससह आदी पीकामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. आणखी पाणी वाढल्यास नागरी वस्तीत पाणी येण्याची शक्‍यता आहे. 

गगनबावडा मार्गावरील वाहतूक पूर्ववत 
असळज - कुंभी नदीच्या पुराचे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर तीन ठिकाणी आलेले पाणी ओसरल्याने आज सकाळपासून मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. तालुक्‍यात दुपारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कमी झालेली पुराची पाणी पातळी सायंकाळनंतर पुन्हा वाढू लागली आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात तालुक्‍यात 115 मिलीमिटर, कुंभी धरणक्षेत्रात 155 मिलीमिटर तर कोदे धरणक्षेत्रात 138 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. कुंभी धरणातून 350 क्‍युसेक्‍स तर कोदे धरणातून 743 क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग अनुक्रमे कुंभी व सरस्वती नदीपात्रात सुरु आहे. 

चिकोत्रा प्रकल्पात 65 टक्के साठा 
पिंपळगाव - संततधार पावसामुळे चिकोत्रा धरणक्षेत्रात 80 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. आजअखेर एकूण1760 मिलीमिटर पाऊस झाला आहे. चिकोत्रा धरण 65%भरले असल्याचे अभियंता उत्तम कापसे यांनी सांगितले. मुरुक्‍टे ता. भुदरगड येथील शेतकरी आनंदा कृष्णा आडसुळ यांचे गावातील जुने घर पावसाने कोसळले. दिंडेवाडी -बारवे चिकोत्रा नदीपात्र भरुन वहात आहे.परीसरातील शेतकऱ्यांची भातरोपलावण कामे अंतीम टप्यात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narsinghwadi Dutt Temple under water