येवला शिर्डी महामार्गावर आंध्रचे 5 साईभक्त ठार, 6 जखमी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

जखमींना तत्काळ आत्मा मलिक हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी हलवण्यात आले होते.उपचार सुरु असतांना पुन्हा दोन भक्तांनी आपला जीव गमावला.

येवला : रविवारची सुट्टी साधून साई बाबाच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा येथून आलेल्या दोन कुटुंबावर आज येवला ते शिर्डी महामार्गावर कोपरगाव जवळ झालेल्या अपघातात काळाने झडप घातली आहे.तीन वाहनाच्या विचित्र अपघातात पाच ठार तर सहा जण जखमी झाले आहेत.

येवला-कोपरगाव रस्त्यावर अंचलगाव फाट्याजवळ रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास कंटेनरने एका वळणावर टाटा छोटा हत्ती आणि टाटा मॅजिक गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात जागेवरच तीन जण ठार झाले होते तर तर अपघातातील नऊ जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना तत्काळ आत्मा मलिक हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी हलवण्यात आले होते.उपचार सुरु असतांना पुन्हा दोन भक्तांनी आपला जीव गमावला.

अजिंठा एक्सप्रेसने नगरसुल रेल्वे स्टेशनवर उतरलेले हैद्राबाद येथील 12 साईभक्त प्रवाशी वाहतूक गाडी टाटा मॅजिकने(MH15 E 4803) शिर्डीला चालले होते.कंटेनर शिर्डीवरून येवल्याकडे येत असताना चालकाचा ताबा सुटला आणि येवल्याकडून शिर्डीच्या दिशेने जाणा-या एक टेम्पो व व्हॅनला जोरदार धडक देऊन त्या दोन्ही गाड्या पलटी झाल्या.पिंपळगाव टोलनाक्यानजीक अंचलगांव फाटा वळणावर कंटेनरची या गाडीलाही जोरदार धडक बसली.

मृत्यूमुखी पडलेले झालेले चालक शिवाजी लक्ष्मण मांजरे(वय 35) हे येवल्यातील होते.श्रीमती मन्ममा गुंडापुरी (वय ५३,रा.लीन्कमपल्ली,ता.नालगोंडा,आंध्रप्रदेश),चेंजरल राधावल (रा.पनकापालेम,जि.प्रकाशम),व्यंकमय्या लक्ष्मिनारायण कलिकाय्या (वय-३४,रा.जोडामेंटला,कुतुबबुलपूर,तेलंगणा) हे तिघे ठार झाले असून पाचव्या मयत महिलेची (वय ३०) ओळख पटलेली नाही.तर या अपघातात शिवशंकर गुंडापुरी,स्वप्ना शिवशंकर गुंडापुरी,उदय शिवशंकर गुंडापुरी,नागराणी पोलपाली,नरेश पोलपाली हे सहा जण जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे.

Web Title: nashik news shirdi sai bhakt killed in accident