मोटारींच्या धडकेत एक ठार; 9 जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

नातेपुते - पुणे-पंढरपूर मार्गावर येथील समता इंग्लिश स्कूलजवळ दोन मोटारींचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ज्ञानेश्‍वर सुखदेव काटे (वय 48, सांगोला) या मटोरचालकाचा जागीच मृत्यू झाला; तर नऊ जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर अकलूजमधील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त इंडिका (एमएच 02 पीए 7834) मोटारीतील प्रवासी मुंबईहून जवळा (ता. सांगोला) येथे आपल्या मूळगावी पाडव्याच्या सणासाठी येत होते. त्याचवेळी हडपसर, पुणे येथील स्विफ्ट (एम. एच. 12 एमएफ 3134) या मोटारीतून पंढरपूरहून देवदर्शन करून पुण्याकडे परतत होते. सकाळी अकराच्या सुमारास या दोन्ही मोटारींची समोरसमोर जोराची धडक झाली. शेजारील शेतात काम करणाऱ्या तरुणांनी व ग्रामस्थांनी 108 रुग्णवाहिकेस संपर्क करून या अपघाताची कल्पना दिली व दोन्ही गाड्यांमधील जखमींना बाहेर काढून उपचारांसाठी पाठविले.
Web Title: natepute news accident death