मुधोळ हाऊंड श्‍वानास राष्ट्रीय मान्यता; देशी ब्रीडचे महत्त्व वाढेल

National recognition of Mudhol Hound Shwanas; The importance of indigenous breeds will increase
National recognition of Mudhol Hound Shwanas; The importance of indigenous breeds will increase

सांगली  "स्टेटस सिम्बॉल' म्हणून विदेशी श्‍वानांना प्रचंड मागणी वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशी श्‍वान पालनाचे आवाहन केले आहे. त्याचवेळी नॅशनल ब्युरो ऑफ निमल जेनेटिक रिसोर्सेस (एन.बी.ए.जी.आर) या राष्ट्रीय संस्थेने मुधोळ हाऊंडे या श्‍वान प्रजातीला देशातील नोंदणीकृत ब्रीड म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या श्‍वानाने महत्त्व वाढेल, असा विश्‍वास पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त सहायक आयुक्त डॉ. व्यंकटराव घोरपडे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

डॉ. घोरपडे म्हणाले, ""पंतप्रधानांनी ऑगस्टमध्ये "मनकी बात' कार्यक्रमात देशातील जनतेला भारतीय देशी जातीची कुत्री पाळण्याचे आवाहन केले. "आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेचा तो भाग. त्यात त्यांनी मुधोळ हाऊंड आणि हिमाचली हाऊंडचा उल्लेख केला. मुधोळ हाऊंड ही जात महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागात मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रजातीचे संवर्धन केले. त्याला सैन्यदलात मानाचे स्थान दिले. मुधोळचे वतनदार राजे मालोजीराव घोरपडे यांनी या जातीच्या पिलाची एक जोडी लंडन भेटीत तेथील पाचव्या किंग जॉर्जला भेट दिली होती. त्यावेळी त्याचे नामकरण मुधोळ हाऊंड झाले.'' 

ते म्हणाले, ""पंधरा वीस वर्षांपासून विदेशी जातीच्या कुत्र्याची मागणी वाढू लागली. साधारण कुटुंबाचा एक स्टेटस सिम्बॉल होऊन गेला. श्‍वानांची ठेवण, वागणं आणि त्यांची रचना ही तेथील मूळ हवामानाला अनुसरून असते. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. देशी प्रजाती या प्रशिक्षणासाठी खूप चांगला प्रतिसाद देतात. इथल्या वातावरणात तयार झाल्यामुळे त्यांची शरीर रचना, कातडे, डोळे, पाय, शेपूटसुद्धा या वातावरणाशी मिळते जुळते असणारे असतात.

मुधोळ हाऊंड ही प्रजाती कशी खेड्यापाड्यात शेतातील वस्तीसाठी अत्यंत योग्य आहे. वाढते सिंचनक्षेत्र आणि शेतावर राहणे, यासाठी तो उपयुक्त आहे. बिदर येथील पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या अधिपत्याखाली मुधोळ येथील केनाईन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये या प्रजातीचे प्रजनन केले जाते. नवयुवकांना आत्मनिर्भर होण्यासाठी भारतीय प्रजातीच्या जोड्या ठेवून पिल्लांची निर्मिती करणे, विक्री करणे असा एक स्वतंत्र आणि चांगला व्यवसाय देखील करता येऊ शकेल.'' 

संरक्षण दलात सन्मान 

नॅशनल सिक्‍युरिटी गार्डमध्ये मुधोळ हाऊंड समाविष्ट होणार आहे. मुधोळ येथील केनाईन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये पिलांची मागणी नोंदवली आहे. शरीराने बळकट व उच्च प्रतीच्या हुंगण्याच्या शक्तीमुळे, हुशारी आणि आज्ञाधारकपणामुळे भारतीय सैन्यदल, सुरक्षा दलात वापर होतोय. एकूणच कमी वजन, लांब पाय त्यामुळे इतर प्रजाती पेक्षा वेगाने धावतात. साधारण पन्नास किलोमीटर प्रतितास ते धावू शकतात. तीन किलोमीटर वरील वस्तूच्या वासाचा मार्ग काढू शकतात. त्यामुळे भारतीय सीमा सुरक्षा दलासह आंध्र प्रदेश, राजस्थान सरकारने पोलिस दलात समाविष्ट केले आहे. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com