शिवाजी विद्यापीठात नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायबर सिक्‍युरिटी डेटा सायन्सेस

शिवाजी विद्यापीठात नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायबर सिक्‍युरिटी डेटा सायन्सेस

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात देशातील पहिले नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायबर सिक्‍युरिटी डेटा सायन्सेस आकाराला येत आहे. त्यासाठी सात कोटी मंजूर झाले असून, ‘सायबर सिक्‍युरिटी ॲम्बॅसडर’ म्हणून विद्यापीठ कार्यरत असणार आहे. सायबरच्या वाढत्या गुन्ह्यांचा चढता आलेख पाहता सेंटर महत्त्वपूर्ण ठरेल.

मानव विकास संसाधन मंत्रालयाच्या पंडित मदन मोहन मालवीय स्किम फॉर टिचिंग ॲन्ड टीचर्स ट्रेनिंग अंतर्गत हे सेंटर विद्यापीठात स्थापन होत आहे. डिजिटल ट्रान्जेक्‍शनच्या अनुषंगाने सिक्‍युरिटीचे महत्त्व लोकांना कळावे, २०२१ पर्यंत दोन हजार टीचर्स प्रशिक्षित व्हावेत व सायबर सिक्‍युरिटी अंतर्गत विविध कोर्सेसची निर्मिती व्हावी, हा सेंटरच्या स्थापनेमागचा उद्देश आहे. सेंटरसाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये अत्याधुनिक लॅब असणार असून तेथे ॲप कसे वापरायचे व एटीएम वापरताना कोणती काळजी घ्यायची, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

गुन्हा घडू नये म्हणून काय करायचे, याबाबत सेंटर मार्गदर्शन करणार आहे. तसेच सायबर ऑडिटही केले जाणार असून सायबर सिक्‍युरिटी अंतर्गत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स जनरेट केले जाईल. सायबर सेक्‍युरिटीचे जाळे तयार करण्यासाठी अमर ठाकरे, दिनेश कुडचे व रोहन न्यायाधीश कार्यरत असणार आहेत. सेंटरचे समन्वयक म्हणून डॉ. आर. के. कामत काम पाहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कविता ओझा, डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. एस. ए. शिंदे, डॉ. टी. डी. डोंगळे, डॉ. यू. आर. पोळ कार्यरत असणार आहेत.

केंद्र सरकारने विद्यापीठात सेंटरला मान्यता देऊन विद्यापीठाचा सन्मान केला आहे. विद्यापीठात तशी सक्षमता आहे, हे त्यातून स्पष्ट होते. राष्ट्रीय स्तरावरच्या सेंटरच्या माध्यमातून सायबर सिक्‍युरिटीबाबत जनजागृती केली जाईल. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, बॅंकांवर होणाऱ्या सायबर अटॅक्‍सना पायबंद घालण्यासाठी मदत होईल.
- डॉ. डी. टी. शिर्के,
प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

महाराष्ट्र पोलिस दलात दोन हजार सायबर एक्‍सपर्ट नियुक्त करायचे आहेत. त्यासाठी गृहमंत्र्यांच्या कार्यालयाशी चर्चा सुरू आहे. सायबर सिक्‍युरिटी सेंटरमधून प्रशिक्षित मनुष्यबळ त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 
- डॉ. आर. के. कामत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com