राष्ट्रवादी आता चालेल माझ्या पद्धतीने - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

सोलापूर - राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांचा वक्तशीरपणा व शिस्त आज जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनुभवली. शहर व जिल्हा राष्ट्रवादीला आलेली सुस्त, सभासदांच्या ऑनलाइन नोंदणीबाबत होणारी चालढकल, कार्यकारिणीच्या न होणाऱ्या बैठकांवरून पदाधिकाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला. आता मी या जिल्ह्यात आलोय, यापुढे माझ्या पद्धतीनेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी चालेल, असा मेसेज पवारांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना दिला.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे प्रभारी म्हणून श्री. पवार यांनी जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आढावा घेण्यासाठी आज सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात श्री. पवार यांच्या उपस्थितीत शहर व जिल्हा राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीला आमदार दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राजन पाटील, शहराच्या बैठकीला शहराध्यक्ष भारत जाधव, उपमहापौर प्रवीण डोंगरे, माजी अध्यक्ष महेश गादेकर, गटनेते पद्माकर काळे उपस्थित होते. 

श्री. पवार बारामतीहून सोलापूर शासकीय विश्रामगृहात आले, तेव्हा पक्षाचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. बैठक सुरू झाल्यानंतर एक एक पदाधिकारी येऊ लागले. बैठकीसाठी कोण कोण तालुकाध्यक्ष आले आहेत, याचा आढावाच श्री. पवारांनी बैठकीत घेतला. आजच्या दौऱ्यासाठी श्री. पवारांना देण्यात आलेली पक्षाची माहिती असो की कार्यकारिणीच्या बैठका, जिल्हा परिषदेतील शेतीनिष्ठ पुरस्कारांच्या ढिसाळ नियोजनावर श्री. पवारांनी शहराध्यक्ष जाधव, जिल्हाध्यक्ष साळुंखे, जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, कृषी सभापती अप्पाराव कोरे यांना चांगलेच सुनावले. 
सोलापूर शहर राष्ट्रवादीमध्ये महिलांची होणारी गळचेपी व महिलांना डावलण्यात येत असल्याची तक्रार वैशाली गुंड यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीत अशा पद्धतीची घटना घडली असेल तर माफी मागून यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घेऊ. पुण्यात व पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने महिलांकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे, तशाच पद्धतीने सोलापूर शहर राष्ट्रवादीतसुद्धा बदल केले जातील, असे श्री. पवारांनी सांगितले.

अजित पवार यांच्या टिप्स...

  • कार्यकारिणीच्या दरमहा बैठका घ्या, इतिवृत्त दाखवा
  • प्रत्येक तालुक्‍यातून किमान एक हजार कार्यकर्त्यांची ऑनलाइन नोंदणी करा
  • त्या-त्या तालुक्‍याची जबाबदारी त्या-त्या तालुक्‍यातील नेत्यांवरच
Web Title: Nationalist be my way by ajit pawar

टॅग्स