मंत्रिपद न मिळाल्याने 'येथे' राष्ट्रवादीत नाराजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

महाविकास आघाडीच्या सरकारचा आज (साेमवार) विस्तार झाला. बहुतांश निष्ठावंतांना मंत्रीपदाची संधी मिळाली. काही आमदारांना संधी न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले. त्यातून राजीनामा सत्र सुरु झाले. 

खंडाळा (जि. सातारा) : आमदार मकरंद पाटील यांना मंञीपदापासुन डावलल्याने खंडाळा तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर आहे.परिणामी आज राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष कडे खंडाळा नगरपंचायत चे तीन नगरसेवक व तीन पक्ष पदाधिकारी असे एकुण सहा जणांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान आज (साेमवार) खंडाळा राष्ट्रवादी काॅंग्रेसची बैठक झाली. या बैठकीत माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दयानंद खंडागळे, नगरसेविका सुप्रिया गुरव, नगरसेविका उज्वला प्रविण संकपाळ यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा प्रदेश सरचिटणीस प्रताप पवार यांच्याकडे सपुर्द करणार असल्याचे सांगितले.

आमदार मकरंद पाटील यांना मंञीपद मिळाले नसल्याचे समजताच सोशल मिडिया तालुकाध्यक्ष मोहसीन पठाण, शहराध्यक्ष प्रविण खंडागळे व विद्यार्थी राष्ट्रवादीचे गणेश धायगुडे यांनीही आपल्या पदाचे राजीनामा दिले असल्याचे स्पष्ट केले. 

पक्षबांधणीपासुन पक्षवाढीपर्यंत पहिल्या फळीचे असणारे माजी खासदार (कै.) लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव मकरंद पाटील यांना मंञीपद मिळणार हे निश्चित असल्याचे समजुन काही कार्यकर्ते हे मुबंईला निघण्याच्या तयारीत होते. माञ पाटील यांना मंञीपदाची संधी नसल्याचे समजातच कार्यकर्त्यांंचा हिरमुड झाला.
 

कुणीही चुकीचे पाऊल उचलू नये : आमदार मकरंद पाटील 

सातारा : नव्या मंत्रीमंडळात माझ्या नावाचा समावेश झालेला नाही म्हणून वाई मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना सोशल मिडियावर व्यक्त केल्या आहेत. काहींनी राजीनामे देण्याची भुमिका घेतली असून कार्यकर्त्यांची भावना मी समजू शकतो. त्यामळे आपल्यासाठी पक्ष हेच सर्वस्व आहे. त्यामुळे कुणीही चुकीचे पाऊल उचलू नये, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले आहे.

जरुर वाचा - मनाचं वेळीच ऐका (डॉ. हमीद दाभोलकर) 

महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये मकरंद पाटील यांचा समावेश झाला नाही. त्यामुळे त्यांचे वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बहुतांश जणांनी पक्षाचे, नगरसेवकपदाचे राजीनामा पक्षाकडे पाठवून दिले. 
ज्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यांचे राजीनामे आणि आमदार मकरंद पाटील यांनी मंत्रीपद न मिळाल्याची समाज माध्यमांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यातील काही पोस्टही व्हायरल झाल्या. हा प्रकार आमदार मकरंद पाटील यांच्या कानावर पाेहचताच त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

आपल्यासाठी पक्ष हेच सर्वस्व

हे आवाहन त्यांनी समाज माध्यमांतून कार्यकर्त्यांपर्यंत पाेहचविले. आपल्या भावनांचा गैरफायदा घेवून विरोधकही सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट टाकत आहेत. त्यांचे हेतू सफल होवू न देता आपण सर्वजण अखंडपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत राहू. नव्या मंत्रीमंडळास माझ्या नावाचा समावेश झाला नाही म्हणून सोशल मिडियावर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. काहींनी राजीनामे देण्याची भूमिका जाहीर केली.

नक्की वाचा -  कसरतींतून  ताे भागवतोय शिक्षणाचा खर्च

कार्यकर्त्यांच्या भावना मी समजू शकतो. तुमच्या प्रेमावरच मी इथपर्यंत आलो आहे. आपण सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच (कै.) लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आपल्यासाठी पक्ष हेच सर्वस्व आहे. त्यामुळे कुणीही चुकीचे पाऊल उचलू नये. आपण सर्वजण अखंडपणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत राहू असे आवाहन पाटील यांच्याद्वारे करण्यात आले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Congress Party Workers Angry In Wai Vidhansabha Constituency