अमाप उत्साह, भक्‍तिभावात नटराज मंदिराचा रथोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

सातारा - येथील श्री उत्तर चिदंबरम्‌ नटराज मंदिरातील देवदेवतांचा वार्षिक रथोत्सव अमाप उत्साह व भक्‍तिभावात आज साजरा झाला. दरम्यान, उद्या (ता. ११) दुपारी श्री नटराज महाभिषेक व कल्याणोत्सव होणार आहे.

सातारा - येथील श्री उत्तर चिदंबरम्‌ नटराज मंदिरातील देवदेवतांचा वार्षिक रथोत्सव अमाप उत्साह व भक्‍तिभावात आज साजरा झाला. दरम्यान, उद्या (ता. ११) दुपारी श्री नटराज महाभिषेक व कल्याणोत्सव होणार आहे.

वेदमूर्ती दत्ताशास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी देवतांच्या मूर्ती वेदमंत्रांच्या जयघोषात रथाकडे आणण्यात आल्या. नगराध्यक्षा माधवी कदम, डॉ. संजोग कदम, ज्येष्ठ उद्योजक धनराजशेठ लाहोटी, कांता लाहोटी, विनोदशेठ राठी, श्रीकांता राठी, रमेश शानभाग, उषा शानभाग, ॲड. दत्ता बनकर, नगरसेवक विनोद जांभळे आदींच्या हस्ते रथपूजन झाले. या वेळी वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट, नारायण राव, मुकुंद मोघे, रणजित सावंत, ॲड. विलास आंबेकर, प्रमोद लाहोटी, पद्‌मनाभ आचार्य, मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन, निरंजन हेगडे उपस्थित होते.

हातात कलश घेतलेल्या सुवासिनींनी रथयात्रेचे स्वागत केले. रथयात्रेत बॅंड, बेंजो व शहनाई पथक, भजनी मंडळ सहभागी झाले होते. रथमार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात व फटाक्‍यांच्या आतषबाजीत रथयात्रेचे स्वागत झाले. सातारा येथील श्री शंकराचार्य मठ व श्री कृष्ण यजुर्वेद पाठशाळेतील ब्रह्मवृदांनी रथमार्गावर मंत्रोच्चार व वेदपठण केले. के. एस. डी. शानभाग विद्यालयाच्या झांजपथकाने सुरेख खेळ सादर केले. सायंकाळी जिल्ह्यातील विविध देवस्थान व तीर्थक्षेत्राचे महंत व मठाधिपतींच्या हस्ते रथातील देवतांची महामंगल आरतीने रथयात्रेची सांगता झाली. 

Web Title: natraj temple rathotsav