नैसर्गिक पद्धतीने कोळपणी करून ज्वारीची वाढ

राजकुमार शहा 
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मोहोळ : ज्वारी पिकाच्या बुडात शेण व गोमुत्राचा फवारा मारून, नैसर्गिक पद्धतीने ज्वारीची कोळपणी करून तिचा जीव वाचवून, वर्षाला किमान दिडशे पोती ज्वारीचे उत्पादन घेण्याचा प्रयोग मोहोळ येथील शैलेश रामदास काकडे हे करीत आहेत. अशी ज्वारी खाण्यास आरोग्यास चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहोळ पंढरपूर रस्त्यालगत काकडे यांची शेती आहे. पाणी अत्यंत कमी. काकडे यांनी झिरो बजेट व नैसर्गिक तत्वानुसार शेती करण्याचा चंग बांधला. गेल्या पंधरा वर्षापासून आपण हा प्रयोग करीत असुन या माध्यमातुन वर्षाला दिडशे पोती ज्वारी उत्पादन घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पेरणी केल्यापासून एकदा वरील प्रमाणे ज्वारीच्या बुडात फवारा मारला असून, येत्या आठवड्यात दुसरा मारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेण व गोमुत्रासाठी मी गिर जातीच्या गाईचे संगोपन करत असल्याचे काकडे यांनी सांगितले. सध्या बैलभाडे महाग झाले आहे, तरीही मी बैलानेच शेती करतो, ट्रॅक्टरचा अजिबात वापर करीत नसल्याचे त्यांनी सांगितले, तर रासायनिक खताची व शेतीची ओळखही नसल्याचे सांगीतले. सध्या ज्वारीला कोळपणीद्वारे बुडाला माती लावण्याचे काम सुरू असल्याचेही काकडे यांनी सांगितले.

Web Title: natural process on jawar by ramdas kakade