निसर्ग, वन्यजीव छायाचित्रांचे सोलापुरात प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

सोलापूर : डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे सोलापुरात पहिल्यांदाच निसर्ग आणि वन्यजीवांच्या "निसर्गाशी नाते जुळवा' या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन 24 ते 27 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. व्यंकटेश मेतन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापूर : डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे सोलापुरात पहिल्यांदाच निसर्ग आणि वन्यजीवांच्या "निसर्गाशी नाते जुळवा' या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन 24 ते 27 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. व्यंकटेश मेतन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 

हे प्रदर्शन डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहाच्या गॅलरीमध्ये सकाळी 11 ते रात्री आठ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनात एकूण 90 छायाचित्रांचा समावेश आहे. यातील 25 टक्के छायाचित्रे सोलापूर परिसरात टिपलेली आहेत. पक्ष्यांचे नंदनवन अशी सोलापूरची ओळख निर्माण व्हावी तसेच नागरिकांमध्ये निसर्गाबद्दल जागरूकता, प्राणी आणि पक्ष्यांबद्दल आवड, पृथ्वी मातेचे संरक्षण याबाबत प्रबोधन करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजिले आहे. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, युगंधर फाउंडेशन, इको फ्रेंडली क्‍लब, सोलापूर फोटोग्राफी असोसिएशन, फोटोग्राफर्स वेल्फेअर असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्‍लब सोलापूर ईस्ट, इनरव्हील क्‍लब ऑफ सोलापूर हार्मनी, लायन्स क्‍लब ऑफ सोलापूर, युथ हॉस्टेल ऑफ असोसिएशन ऑफ इंडिया यांनी सहभाग घेतला आहे.

डॉ. मेतन हे गेल्या 22 वर्षांपासून पक्षीनिरीक्षण करीत आहेत. सहा वर्षांपासून वाइल्डलाइफ फोटोग्राफीची आवड जोपासली असून आजवर सोलापूरसह देश-विदेशात वन्यजीवांची फोटोग्राफी केली आहे. मुंबई येथील जहॉंगीर आर्ट गॅलरी आणि बंगलोर येथील प्रतिष्ठित चित्रकला परिषद येथे डॉ. मेतन यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन झाले आहे. 

या पत्रकार परिषदेस रेश्‍मा माने, सोमेश्‍वर लवंगे, ज्योती भंडारे, चिदानंद मुस्तारे, अर्चना जाजू, संजीवकुमार कलशेट्टी, महेश बनसोडे उपस्थित होते.

Web Title: nature and wildlife photo exhibition in solapur