#Navdurga सायबर क्राईमचा छडा लावणाऱ्या पोलिस वूमन

#Navdurga सायबर क्राईमचा छडा लावणाऱ्या पोलिस वूमन

शीतल जाधव येथील सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक. बीएस्सी झाल्यानंतर त्यांनी ‘बीएड’ केले आणि काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. याचदरम्यान पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली आणि पहिल्याच प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या.

नालासोपारा येथे पहिले पोस्टिंग मिळाले. हा परिसर म्हणजे मुली पळवण्याचे प्रकार वारंवार घडणारे. अर्थातच ‘हेवी’ पोलिस स्टेशन. त्यामुळं येथे कार्यरत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यातून अनुभवांची शिदोरी वाढत गेली.

कोल्हापुरात बदली झाली आणि एक जुलै २०१७ ला सायबर पोलिस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर या ठाण्याची जबाबदारी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सोपवली. जशा तक्रारी येऊ लागल्या तसे या क्षेत्रातील ज्ञान वाढत गेले आणि आता त्या कुठलाही सायबर गुन्हा असो, त्याचा छडा लावण्यात माहिर बनल्या. त्या सांगतात, ‘‘कुठलाही चोर दहापटीने हुशार असतो. त्यातही सायबर गुन्हे करणाऱ्यांची चलाखी भल्याभल्यांना थक्क करणारी असते. एकाची सात हजार रुपयांची फसवणूक झाली होती. त्याच्या मुळाशी गेल्यानंतर हा सारा प्रकार राजस्थानातील कामा या गावातून सुरू असल्याचे लक्षात आले.

गुन्हेगाराला पकडायचेच, हा चंग बांधला आणि पोलिसांची टीम फ्लाईटने राजस्थानात पोचली. गावात गेल्यानंतर तर मोठा फलकच लावलेला आहे आणि त्यावर लिहिलेले आहे, ‘सावधान धोखेबाजोंसे सावधान...’ या एका तक्रारीवरून तपास करताना आम्हांला सत्तर हजार रूपयांचा खर्च आला आणि रिकव्हर करायचे होते सात हजार. आजही दिवसाला पंधरा ते सोळा तक्रारी दाखल होतात त्या केवळ अज्ञानामुळे.’’

शीतल जाधव सांगतात...

  •  तक्रारी येतात, पण नंतर त्या परस्पर मिटतात. त्यामुळे गुन्हे रजिस्टर होण्याचे प्रमाण कमी.
  •  सोशल मीडियावर ‘डीपी’ ठेवताना किंवा ‘अबाऊट’मध्ये मोबाईल नंबर टाकताना विचारपूर्वक टाका. विशेषतः महिला व मुलींसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
  •  तुम्ही कुठे आहात, याचे ‘स्टेटस’ अजिबात ठेवू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com