#NavDurga एकमेकींना मदत केल्यासच स्त्री सक्षम : शौमिका महाडिक

#NavDurga एकमेकींना मदत केल्यासच  स्त्री सक्षम : शौमिका महाडिक

‘‘स्त्रीनेच स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे राहिले पाहिजे. एका स्त्रीने सक्षम झाल्यानंतर दुसऱ्या स्त्रीला सक्षम करण्यासाठी मदतीचा हात द्यायला हवा. स्पर्धा न करता एकमेकींचा हात धरून प्रगती केली तरच महिला पूर्णतः सक्षम होऊ शकतात, असे स्पष्ट मत जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

त्या म्हणाल्या, ‘‘नवरात्रोत्सवाच्या काळात आपण देवीची पूजा करतो. देवींची लक्ष्मी, सरस्वती व दुर्गा अशी तीन रूपे आहेत. देवानेही त्यांना वित्त, शिक्षण व संरक्षण ही कार्ये वाटून दिली आहेत. अशाच दुर्गा सध्या समाजात तयार होणे गरजेचे आहे.’’

जिल्हा परिषदेच्या महिलांविषयक कार्याचा आढावा घेताना त्या म्हणाल्या, ‘‘महिला आर्थिक सक्षम झाल्याच आहेत. त्यांना पूर्णतः सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने बचत गटांतील महिलांसाठी प्रदर्शन भरविले जाते. बचत गटांना कर्ज पुरवली जातात. त्यांच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. समुपदेशन केंद्रांच्या माध्यमातून संवाद साधत ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त संसार पुन्हा सावरले आहेत. महिलांसाठी ज्यावेळी उपक्रम राबविले जातात, त्यावेळी मी स्वतः आवर्जून उपस्थित असते. म्हणजे मला त्या त्या भागातील महिलांच्या समस्या कळतात व त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करते.’’ 

कौटुंबिक जबाबदारीबद्दल त्या म्हणाल्या, ‘‘व्यवसाय किंवा नोकरी करताना महिलांनी स्वतः काही बंधने पाळली पाहिजेत. मुलांनी घरात येण्यापूर्वी मी स्वतः घरी असते. मुलांसाठी क्वाँटीटीपेक्षा क्वॉलिटी टाईम देणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य निरोगी राहू शकते.’’ सोशल मीडियाच्या वापराविषयी त्या म्हणाल्या, ‘‘सोशल मीडिया हे वरदान आहे. त्याच्या माध्यमातून आपण विकास करू शकतो; पण सोशल मीडिया जितका चांगला आहे, तितकाच वाईटही आहे.’’ नकारात्मकता नव्हे तर सकारात्मकता निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर व्हायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आरोग्याची काळजी घेणे गरजेचे
स्त्री ही कुटुंबाचा कणा असते. तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तिच्यामुळेच कुटुंब निरोगी राहू शकते. मानसिक आरोग्यावरच शारीरिक आरोग्य निर्भर असते म्हणून स्त्रीने नेहमी आनंदी असले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या वतीने ॲनिमिया जनजागृती कार्यक्रम राबविले जातात. मासिक पाळीच्या व्यवस्थापनासाठी विविध कार्यशाळेच्या माध्यमातून त्याविषयीच्या अंधश्रद्धा, गैरसमज, स्वच्छता असे उपक्रम राबविले जातात.

शौमिका महाडिक म्हणतात...

  •      स्त्रीने स्त्रीचा सन्मान करणे आवश्‍यक
  •      संस्कार, संस्कृती टिकविण्याची गरज 
  •      मुलांमध्ये संस्कृतीचा अभिमान जागृत करण्यासाठी संस्कार
  •      जि. प.मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी सर्व पातळीवर सुरक्षा
  •   अधिकारी व लोकप्रतिनिधी अशी सांगड असली तर सुव्यवस्थित प्रशासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com