जोतिबा डोंगरावर नवरात्र उत्सवास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

जोतिबा डोंगर - जोतिबाच्या नावानं चांगभलं जयघोषात श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरात आज भक्तीमय वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवास पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाला. सनई, तुतारी, ढोल ताशे,चौघडे शिंग या वाद्याच्या निनादात जोतिबाच्या मुख्य मंदिरात सकाळी घटस्थापनेचा विधी झाला.

पहाटे पासूनच मंदिरात धार्मिक विधी सुरू झाले.  सकाळी आठ वाजता समस्त दहा गावकऱ्यांनी श्री जोतिबा देवाची बैठक सालंकृत पूजा बांधली. ही पूजा नागवेलीच्या पानांची सजवली होती. सकाळी साडेदहा वाजता जोतिबा मंदिरातील घटस्थापनेचा विधी झाल्यानंतर यमाईदेवी तुकाई भावकाई मंदिरात घटस्थापना विधीसाठी पुजारी, ग्रामस्थ, देवसेवक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कर्मचारी अधिक्षक महादेव दिंडे व सर्व लवाजमा मिरवणुकीने गेला.

या ठिकाणी सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी बारा वाजता धुपारती सोहळा झाला. आरती मुख्य मंदिरात जाताना प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. आज रविवार असल्याने व पहिली माळ असल्याने डोंगरावर मोठी गर्दी होती. 

जोतिबा देवाचा जागर सोहळा

देवाचा सोहळा पाच आक्‍टोबरला (येत्या शनिवारी ) होत असून या दिवशी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. रात्रभर मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतील. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Jotiba Temple Navaratri puja