आता नवरदेवही म्हणतोय 'मी पुन्हा येईन'

Navedev
Navedev

पंढरपूर (सोलापूर) :  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभांमधून 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन', असे आत्मविश्वासाने सांगितले होते. त्यांच्या त्या भाषणांचा प्रभाव जनमानसात आजही पाहायला मिळतो आहे.
अनेक वेळा उपहासाने तर अनेकदा विश्वासाने 'मी पुन्हा येईन' या वाक्याचा वापर केला जातोय. एका नवरदेवाने देखील उखाणा घेताना  'मी पुन्हा येईन' या वाक्याचा अफलातून उपयोग करत पत्नीचे नाव घेतले आहे.

ग्रामीण आणि शहरी भागात नावीन्यपूर्ण उखाणे

''संसारात दोघांच्या मी पूर्णपणे सहयोग देईन, जाईचं नाव घेतो मी पुढच्या जन्मीही पुन्हा येईन, पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. ग्रामीण आणि शहरी भागात नावीन्यपूर्ण उखाणे घेतले जातात. ग्रामीण भागात बहुतेक वेळा परंपरागत उखाणे ऐकायला मिळतात. 'भाजीत भाजी मेथीची आणि अनुसया माझ्या प्रीतीची' अशा पद्धतीचे अनेक उखाणे वर्षानुवर्षे लोकप्रिय आहेत. गेल्या काही वर्षात ग्रामीण आणि शहरी भागात नवनवीन उखाणे घेऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न
महिला वर्गातून होताना दिसतो आहे.

पुन्हा येईन, मी पुन्हा येईन

सध्या लग्नसराई सुरू असल्याने वैशिष्ट्यपूर्ण उखाणे ऐकायला मिळू लागले आहेत. लग्नाच्या उखाण्यातून विधानसभा निडणुकीचा फिव्हर अजूनही दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी "नंदीचं नाव असतं महादेवाच्या आधी, आरतीचं नाव घेतो मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी' हा उखाणा सगळीकडे
व्हायरल झाला होता.  आता देवेंद्र फडणवीस यांच्या शैलीत एका नवरदेवाने घेतलेला उखाणा चर्चेचा ठरत आहे. हा नवरदेव कुठला आहे ते समजू शकलेले नाही परंतु त्याने घेतलेला 'संसारात दोघांच्या मी पूर्णपणे सहयोग देईन, त्रजाईचं नाव घेतो मी पुढच्या जन्मीही पुन्हा येईन, पुन्हा येईन, मी पुन्हा येईन" या उखाण्याचा व्हिडीओ सोशल
मीडियातून सर्वत्र व्हायरल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com