Loksabha 2019 : माळशिरसमधून भाजपला लाखाचे मताधिक्य मिळाल्यास राजकारण सोडू: संजय शिंदे

भारत नागणे
गुरुवार, 11 एप्रिल 2019

भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे  खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कंबर कसली आहे. तर तिकडे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहेत. अशातच आता माढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लक्ष घातल्याने चुरस वाढली आहे.

पंढरपूर : राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघात प्रचाराचा जोर वाढू लागली आहे. मुख्य लढत भाजप आणि राष्ट्रवादी अशी असली तरी रणजितसिंह मोहिते पाटील विरूध्द राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे अशीच चुरशीने लढत होत आहे.

अशातच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माळशिसरस तालुक्यातून भाजप उमेदवाराला एक लाखांचे मताधिक्य देऊ असा शब्द दिला, तर मोहिते पाटील म्हणतायत तेवढे लीड मिळाले तर आपण राजकारण सोडू, असा आत्मविश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंनी व्यक्त केला आहे.

भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे  खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कंबर कसली आहे. तर तिकडे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहेत. अशातच आता माढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही लक्ष घातल्याने चुरस वाढली आहे.

काल पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प मेळावा पार पडला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातून भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाख मतांचे लीड देऊ असा शब्द दिला आहे. 

यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदें यांनी  रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या एक लाखांच्या मताधिक्याची खिल्ली उडवत माळशिरस मधून तेवढे मताधिक्य मिळाले तर आपण राजकारण सोडू असे म्हटले आहे. प्रचाराच्या या रणधुमाळीत रणजितसिंह मोहिते पाटील आणि संजय शिंदे  यांच्यात चांगलेच वाकयुध्द रंगणार हे स्पष्ट दिसू लागले आहे.

Web Title: NCP candidate Sanjay Shinde open challenge to Ranjitsingh Mohite Patil in Madha