Loksabha 2019 : सुशीलकुमार शिंदेंचे शरद पवारांना भावनिक आवाहन (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

नोकरी करत असताना शरद पवार यांनी मला राजकारणात आणलं, आजवर मी अनेक वेळा निवडणुका लढविल्या, त्यावेळी पवार यांनी माझी साथ सोडली नाही, आता शेवटच्या निवडणुकीमध्ये मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे.

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोलापूरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला. यावेळी बोलताना शिंदे यांनी आपल्याला शरद पवार यांनीच राजकारणात आणल्याची आठवण करून दिली, आता शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांची साथ पाहिजे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, की नोकरी करत असताना शरद पवार यांनी मला राजकारणात आणलं, आजवर मी अनेक वेळा निवडणुका लढविल्या, त्यावेळी पवार यांनी माझी साथ सोडली नाही, आता शेवटच्या निवडणुकीमध्ये मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे.

Web Title: NCP chief Sharad Pawar campaign for Congress leader Sushilkumar Shinde in Solapur