पुराचे संकट पुन्हा येणार नाही यावर विचार करू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

दानोळी - महापूराने शिरोळ तालुक्‍यातील बहुतांशी गावावर संकट आणले; मात्र जिल्ह्यातील जनता संकटाला भीत नाही, 2005 पेक्षा भीषण स्थिती असून मोठे नुकसान झाले आहे. त्याचे योग्य पद्धतीने पुनर्वसन होण्यासाठी व पूरग्रस्तांचे संसार उभे रहावेत अशी मदत मिळावी यासाठी सरकारला विनंती करतो. पुन्हा संकटच येणार नाही अशी काय उपाययोजना आखता येईल काय, यादृष्टीनेही विचार सुरू आहे, असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

ते आज शिरोळ तालुक्‍यातील पूरग्रस्त भागात दौरा करून नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयात असणाऱ्या कोथळीतील पूरग्रस्त, दानोळी व कवठेसार येथील पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, ए. वाय. पाटील, यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थीत होते. 

हसन मुश्रीफ म्हणाले, ""बुडालेल्या उसासाठी एकरी एक लाख व इतर पिकासाठी 40 हजार रुपयाची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत सरकारचा कोणतीही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचली नाही. ती लवकर पोहचावी, तसेच मुलांच्या दफ्तर, शालेय साहित्य व ड्रेससाठी विद्याप्रतिष्ठानकडून 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे.'' 

राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, ""तालुक्‍यातील प्रत्येक पूरग्रस्त घटकापर्यंत राष्ट्रवादी कॉग्रेस पोहचली आहे. मदतीचा ओघ आहेच. पक्षाकडून 100 डॉक्‍टरांतचे पथक सेवेत आहे. शाश्वत मदत देण्यासाठी सरकाकडे आम्ही आग्रही आहोत. शेवटच्या माणसांपर्यंत मदत मिळवून देवू.'' 

जैनापूर येथे शरद इन्स्टिट्यूटचे एक्‍झिक्‍युटीव्ह डायरेक्‍टर अनिल बागणे, सांगलीचा माजी महापौर सुरेश पाटील, कोथळीच्या सरपंच अमृता पाटील, संजय नांदणे उपस्थित होते. दानोळीत सरपंच सुजाता शिंदे यांनी स्वागत केले. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी पूरस्थितीची माहिती दिली. कवठेसार येथे सरपंच दीपाली भोकरे यांनी स्वागत केले. पूरस्थितीची माहिती पोपट भोकरे यांनी दिली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar comment