शरद पवार म्हणाले, सरकारविषयी जनतेच्या मनात चिड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - सरकारविषयी जनतेत चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीडसह अन्य ठिकाणी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांना लोकांची शक्तिप्रदर्शन करत गर्दी होत असल्याचे 

कोल्हापूर - सरकारविषयी जनतेत चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, बीडसह अन्य ठिकाणी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांना लोकांची शक्तिप्रदर्शन करत गर्दी होत असल्याचे 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यानंतर श्री. पवार यांनी पत्रकारांसोबत चर्चा केली.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी विविध पातळ्यांवर प्रचार करायला सुरवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर सभा घेतल्या जात आहेत. या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून श्री. पवार यांनीही समाधान व्यक्त केले. 

श्री. पवार म्हणाले, ‘‘सरकारविषयी लोकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. आज साताऱ्यामध्ये भव्य सभा झाली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. असाच भरघोस प्रतिसाद बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांत घेतलेल्या सभांना मिळाला आहे. तरुण वर्गही या सभांना हजेरी लावत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.’’

विधानसभेसाठी सुरू असलेल्या सभांमध्ये राष्ट्रवादीकडे मोठी गर्दी होताना दिसत आहे. सरकारच्या धोरणाबद्दल आणि अंमलबजावणीबाबत लोकांमध्ये खदखद आहे. ही सर्व खदखद विधानसभा निवडणुकीमध्ये दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला, पण कार्यकर्त्यांनी पक्ष सोडलेला नाही. याच कार्यकर्त्यांच्या जोरावर महाराष्ट्रात होणाऱ्या प्रचार सभांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. दरम्यान, श्री. पवार यांनी श्री. पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर ते येथील एका खासगी हॉटेलमध्ये निवासासाठी गेले. तेथे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Chief Sharad Pawar comment