एनडींना भाषण करायला सांगा, तब्येत लगेच सुधारेल : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - कदमवाडी येथील ॲपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांना प्रकृती अस्वस्थामुळे दाखल केले आहे. त्यांना पाहण्यासाठी आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार येथे आले होते.  

कोल्हापूर - कदमवाडी येथील ॲपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांना प्रकृती अस्वस्थामुळे दाखल केले आहे.  त्यांना पाहण्यासाठी आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार येथे आले होते.  

यावेळी श्री पाटील यांना पाहून श्री पवार म्हणाले, त्यांना भाषण करायची संधी दिली तर ते लगेच बरे होतील. असे मिश्किलपणे वक्तव्य श्री पवार यांनी करताच पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. गेल्या तीन दिवसापासून ते दवाखान्यात दाखल आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Chief Sharad Pawar comment on N D Patil