दहा दिवसांनंतर संजयमामा राजीनामा देणार: शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माणच्या दुष्काळासाठी दीड कोटी रूपयांचा निधी आपल्या खासदार फंडातून देण्याचा निर्णय घेतला. हा निधी कोठे किती खर्च करायचा याची जबाबदारी त्यांनी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यावर सोपविली आहे. खासदार शरद पवार यांनी आज माण तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीची पहाणी केली. 

दहिवडी (ता. माण, जि.सातारा) : आणखी 10 दिवसांनी संजयमामा शिंदे यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण 10 दिवसांनी संजयमामा आमच्यासोबत दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करत तुम्ही त्यांना मतदान केले आहे ना, असा प्रश्‍न उपस्थितांना विचारला. त्यावर सर्वांनी हो...म्हणून उत्तर दिले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माणच्या दुष्काळासाठी दीड कोटी रूपयांचा निधी आपल्या खासदार फंडातून देण्याचा निर्णय घेतला. हा निधी कोठे किती खर्च करायचा याची जबाबदारी त्यांनी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यावर सोपविली आहे. खासदार शरद पवार यांनी आज माण तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीची पहाणी केली. 

येथील सात गावांत पहाणी करून तेथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजयमामा शिंदे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, सुभाष नरळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा कविता म्हेत्रे, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, रमेश पाटोळे, संदीप मांडवे, प्रविण इंगवले, उद्योग मंत्रालयाचे उपसचिव नामदेव भोसले, शिवाजीराव सर्वगोड,आदी उपस्थित होते. 

शिदी खुर्द येथे श्रमदानातून सुरू असलेल्या वॉटर कपच्या कामांना खासदार शरद पवार यांनी आजसिकाळी भेट दिली. तसेच कामावरील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी श्री. पवार यांनी माण तालुक्‍यातील दुष्काळ निवारणासाठी स्वत:च्या खासदार फंडातून दीड कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला. हे पैसे कोठे किती खर्च करायचे याची जबाबदार राष्ट्रवादीचे नेते व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यावर सोपविली. यावेळी श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी नाष्टा मिळतो का, याची विचारपूस केली. त्यावर आम्हाला पुलाव दिला जातो, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर त्यांनी मटणाचा इशारा करत मिळते का विचारले. ग्रामस्थांनी नाही असे सांगत शाकाहारीच जेवण मिळते, असे सांगितले.

Web Title: NCP chief Sharad Pawar confident about wining Madha