Vidhan Sabha 2019 : कुस्ती पैलवानांशी होते, 'अशांशी' नाही: पवार (Video)

Sharad Pawar
Sharad Pawar

बार्शी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, पण कुस्ती खेळायला कोणच नाही या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुस्ती पैलवानांशी होते, 'अशांशी' नाही, असे म्हणत हातवारे केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) बार्शीमध्ये जाहीर सभा झाली. बार्शीतील राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. यावरूनच पवार यांनी हातवारे करत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला.

पवार म्हणाले, की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे जरी म्हणत असले तरी विरोधक नाही. तसेच आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मला त्यांना सांगायचे आहे कुस्ती पैलवानांशी होते, इतरांशी नाही. उद्धव ठाकरे तुम्हाला सरकार चालवायचे आहे, स्वयंपाक करायचा नाही. 370 कलम रद्द होण्याला आमचा पाठिंबा आहे. पण कलम 371 हेही आहे हे लक्षात ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com