शरद पवारांनी दोन्ही राजेंना घेतले एकाच गाडीत (व्हिडिओ)

Satara
Satara

सातारा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील दोन राजांत पुन्हा एकदा मनोमिलन होण्याची चर्चा सुरु असतानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आले असता दोन्ही राज्यांना एकाच गाडीत घेत प्रवास केला.

साताऱ्यात दोन्ही राजांच्या मनोमिलनाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. त्यासाठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातील मुहूर्त ठरविण्यात आला असून योध्दा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन राजांची मने एकत्र करण्याचा प्रयत्न होणार आहेत. त्यासाठी ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांना साकडे घालण्यात आले आहे. याबाबत सध्या दोन्ही बाजूंच्या समर्थकांत जोरदार चर्चा असली तरी निष्ठावंतांना हे मनोमिलन रूचणार का, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

राजघराण्यातील खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद आणि मनोमिलनही जिल्ह्याला माहिती आहे. गेल्यावर्षी झालेल्या पालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही राजांचे मनोमिलन फिस्कटले. त्यानंतर दोघांत टोकाचे मतभेद झाले. या वादात दोघांचेही निष्ठावंत होरपळून निघाले. पण वाद कायमस्वरूपी उपयोगाचा नाही. तो एकामेकांच्या आगामी वाटचालीत काट्याप्रमाणे टोचू शकतो. हे ओळखून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोघांचीही वाटचाल सुखरूप व्हावी, यासाठी एकमेकांपासून दुरावलेल्या दोन राजांचे पुन्हा मनोमिलन करण्याची प्रक्रिया सध्या साताऱ्यात सुरू आहे. 

याचाच प्रत्यय म्हणून साताऱ्यात यशवंत हॉस्पिटल आणि यशवंत डायग्नोसिस सेंटरच्या उद्घाटनाला शरद पवार पुण्याहून हेलिकॉप्टरने साताऱ्यात दाखल झाले. रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अनिल पाटील यांनी शरद पवार यांना निमंत्रित केले होते. पवार येथे दाखल होताच त्यांनी स्वागत करणाऱ्या उदयनराजेंसह, शिवेंद्रसिंहराजे आणि आमदार शशिकांत शिंदे यांना एकाच कारमध्ये घेत पोलिस कवायत मैदान ते करंजेपेठ रुग्णालय असा प्रवास केला.

शिवेंद्रसिंहराजे यांच्या एमएच.11.1111 या नंबर च्या गाडीतून शिवेंद्रराजे गाडी चालवत होते. तर, शरद पवार यांच्या शेजारील सीटवर बसले होते आणि पाठीमागे उदयनराजे बसले होते. उदयनराजे व शिवेंद्रराजे हे दोन्ही राजे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील महत्वाचे चेहरे आहेत. त्यांच्यातील वादाच्या प्रसंगामुळे शरद पवार यांनी दोन्ही राजे एकत्र आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत. यात त्यांना आता यश येताना पाहायला मिळतंय अस म्हणले तर काही वावग ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com