भाजपमधील मेगाभरती म्हणजे 3 लोक का?: शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

पक्षातील कुणी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या शुभेच्छा आहेत. इतक्या वर्षांत तर कधी झालं नाही तेव्हा कधी आम्हाला जाणवलं नाही. उदयनराजेंचे आणि माझं आजून बोलणे झाले नाही. एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते चालले आहेत हे त्यांनी जाहीर केले. चंद्रकांत पाटील मला भेटायला आले, तर मी काय असं म्हणू का की ते पक्षात आले.

सातारा : भाजपमध्ये बुधवारी झालेली मेगाभरती म्हणजे राष्ट्रवादीतून गेलेले तीन आमदार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

भाजपमध्ये बुधवारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आमदार व नेत्यांनी प्रवेश केला. शिवेंद्रसिंहराजे, संदीप नाईक, वैभव पिचड या राष्ट्रवादीच्या आमदारांसह मधुकर पिचड, चित्रा वाघ यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. याविषयी बोलताना पवार यांनी कधी कधी असा प्रसंग येतो, मला सामना करायचा अनुभव आहे, असे त्यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, की पक्षातील कुणी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या शुभेच्छा आहेत. इतक्या वर्षांत तर कधी झालं नाही तेव्हा कधी आम्हाला जाणवलं नाही. उदयनराजेंचे आणि माझं आजून बोलणे झाले नाही. एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते चालले आहेत हे त्यांनी जाहीर केले. चंद्रकांत पाटील मला भेटायला आले, तर मी काय असं म्हणू का की ते पक्षात आले. राजकारणात लोकांच्या प्रश्नांसाठी अशा भेटी घ्याव्या लागतात. आम्हाला सातारच्या जागा लढवण्यासाठी उमेदवारही मिळेल आणि सातारची जागा राष्ट्रवादी राखेल याची मला चिंता नाही. मला शिवेंद्रराजेच म्हणाले होते ते जाणार नाहीत, पण ते गेले. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी लढवणार असून, आतापर्यंत तीन अर्ज आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar talked about NCP MLAs enters in BJP