मुख्याधिकारी यांना धमकी देणाऱ्या  राष्ट्रवादी नगरसेवकाचा अटकपूर्व जामिन फेटाळला

court.jpg
court.jpg

इस्लामपूर- मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्यावर खुर्ची घेऊन धावून जावून त्यांना धमकी देणारे राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव यांचा अटकपूर्व जामिन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला. त्यांच्या अटकपूर्व जामिन अर्जावरील सुनावनी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. शनिवारी अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही बाजूच्या वकीलांनी युक्तीवाद केला होता. आज जाधव यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्याचा निकाल दिला. त्यामुळे जाधव यांना केव्हाही अटक होवू शकते. 

मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना मारण्याचा प्रयत्न व धमकी दिल्याप्रकरणी खंडेराव जाधव यांच्यावर शासकीय कामात अडथळा व दहशत निर्माण केल्याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात 28 एप्रिलला गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर 29 एप्रिलला कचरा गाडीतून दारूची वाहतूक केल्याप्रकरणी लगेच दुसरा गुन्हा दाखल झाला. खंडेराव जाधव यांनी मुख्याधिकारी यांच्या केबीनमध्ये जावून अश्‍लिल शिवीगाळ करुन, केबीनमधील खुर्ची उचलून अंगावर धावून गेल्याची तक्रार होती. तसेच चोरटी दारू वाहतूकप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणला. इस्लामपूर पोलिसांनी त्यांच्यावर कलम 353,509, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातून आपली सुटका होणार नाही हे लक्षात येताच जाधव यांनी अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून येथील जिल्हा सत्र न्यायालयात न्यायालयात धाव घेतली. गुरूवारी 30 एप्रिलला या अर्जावर सुनावनी होणार होती; मात्र पोलीसांच्याकडून उशिरा माहिती प्राप्त झाली. त्यामुळे सुनावणी शनिवार 2 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. शनिवारी अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणरी व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रणजीत पाटील यांनी युक्तिवाद केला.

ते म्हणाले, "ज्या चोरटया दारु वाहतुकीचे अनुषंगाने सदरचा गुन्हा घडला आहे. त्याबाबत दारु कोणाच्या मालकीची होती, यामध्ये आरोपीचे काय हितसंबंध होते. त्याचप्रमाणे दारुची वाहतूक करुन दारुची विल्हेवाट कोठे लावली? या बाबींचा तपास होणे आवश्‍यक असल्याने आरोपीला अटक करुन चौकशी होणे आवश्‍यक असल्याने अटकपूर्व जामिन अर्ज नामंजुर व्हावा. तसेच अटकपुर्व अर्ज मंजुर झाल्यास सध्य स्थितीमध्ये युध्दपातळीवर झटणारे शासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या मनोबलावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.'' न्यायाधीशांनी दोन्ही वकिलांचा युक्तिवाद ऐकून याबाबत आज सोमवारी अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्याचा निकाल दिला. त्यामुळे जाधव यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com