खासदार महाडिकांना पुन्हा उमेदवारी नको

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा जिल्हा परिषदेची, सर्व ठिकाणी पक्षाचे खासदार असतानाही धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षाची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खासदार आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. 

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असो अथवा जिल्हा परिषदेची, सर्व ठिकाणी पक्षाचे खासदार असतानाही धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा पक्षाची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खासदार आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. 

मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज बैठकीचे आयोजन केले होते. बैठक खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातून बैठकीस आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, धैर्यशील माने, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, राजू लाटकर आदी उपस्थित होते.

खासदार पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत उपस्थित नेत्यांना विचारणा केली. यावर कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार कोण आहेत? अशी विचारणा पोवार आणि लाटकर यांनी केली. विद्यमान खासदार महाडिक हे पक्षाच्या विरोधात काम करतात. याबाबत त्यांनाही विचारा, अशी दोघांनी यावेळी मागणी केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार महाडिक यांच्याकडे याबाबत यावेळी विचारणा केली. मात्र, खासदार महाडिक यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पोवार यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी धनंजय महाडिक सोडून कोणीही उमेदवार द्या, अशी मागणी केली.

जयंत पाटील यांना इचलकरंजीतून उमेदवारी द्या
माजी खासदार निवेदिता माने व पुत्र धैर्यशील माने यांनीही इचलकरंजी (हातकणंगले) लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली. मतदारसंघात खासदार शेट्टी यांच्याबरोबर जाऊन राष्ट्रवादीला फायदा होणार नसल्याचे त्यांनी खासदार पवार यांना सांगितले. जर आम्हाला तिकीट मिळत नसेल तर ते आवाडे यांना अथवा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना द्यावे, अशी मागणी माने यांनी पवार यांच्याकडे केली. 

 

Web Title: NCP demand MP Mahadik does not want to re-nominate