राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज पहिली २० उमेदवारांची यादी जाहीर केली. यात एक विद्यमान सदस्य, दोन विद्यमान सदस्यांचे पती व दोन माजी सदस्यांचा समावेश आहे.  यात नव्‍या चेहऱ्यांना संधी देण्‍यात आली आहे.

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज पहिली २० उमेदवारांची यादी जाहीर केली. यात एक विद्यमान सदस्य, दोन विद्यमान सदस्यांचे पती व दोन माजी सदस्यांचा समावेश आहे.  यात नव्‍या चेहऱ्यांना संधी देण्‍यात आली आहे.

शुक्रवारी (ता. ३) उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आज जाहीर झालेल्या यादीत आरपीआय गवई गटाला सांगरुळ (ता. करवीर)ची एक जागा दिली आहे. आज जाहीर झालेल्या उमेदवारीमध्ये विद्यमान सदस्या सुनीता देसाई, विद्यमान सदस्य मंगल कलिकते यांचे पती संजयसिंह कलिकते, शैलजा पाटील यांचे पती सतीश पाटील, माजी सदस्य जयवंत शिंपी, वसंतराव धुरे व करवीर पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या अरुणिमा माने यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या दोन दिवस मुलाखती घेतल्या. त्यातून उमेदवार निश्‍चित करण्यात आले. ती यादी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात आली. प्रदेशने त्याला मंजुरी दिल्यानंतर आज या उमेदवारांची यादी जाहीर झाली. काही ठिकाणी उमेदवारांची संख्या अधिक आहे, त्याठिकाणी निर्णय घेताना अडचणी येत असल्यामुळे असे मतदारसंघ मागे ठेवण्यात आले आहेत. आज जाहीर झालेले उमेदवार असे, कंसात मतदारसंघ व तालुक्‍याचे नाव - विजय बोरगे (पिशवी, ता. शाहूवाडी), सपना प्रदीप धनवडे (घुणकी), स्वाती महेश माळी (हुपरी),
लखन बेनाडे (रेंदाळ, ता. हातकणंगले), मनोज गणपतराव फराकटे (बोरवडे), अर्चना विकास पाटील (चिखली, ता. कागल), अशोक बापू घाडगे - आरपीआय गवई गट (सांगरुळ), अरुणिमा सुनील माने (उजळाईवाडी, ता. करवीर), दिलीप लहू पाटील (तिसंगी) व प्रकाश धोंडिराम पाटील (असळज, ता. गगनबावडा), संजयसिंह कलिकते (कौलव), सविता राजाराम भाटले (राधानगरी), शमशादबी शौकत पाटील (कसबा वाळवे, ता. राधानगरी), जीवन पांडुरंग पाटील (आकुर्डे) व सुनीता धनाजीराव देसाई (कडगाव, ता. भुदरगड), जयवंत गुंडोपंत शिंपी (आजरा) व वसंतराव बापूसो धुरे (उत्तूर, ता. आजरा), सतीश भीमगोंडा पाटील (गिजवणे) व दीपकराव भैयासो जाधव (नेसरी, ता. गडहिंग्लज), प्रियांका संपतराव पाटील (पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा).

Web Title: NCp first list announced