राष्ट्रवादी गटनेतेपदी लाड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेडपी गटनेतेपदी शरद लाड यांची, तर पक्षप्रतोदपदी चंद्रकांत पाटील यांची आज निवड झाली. राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, आमदार सुमन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात बैठक झाली.

पिण्याच्या पाण्यासह राष्ट्रवादीचे झेडपी सदस्य, कार्यकर्ते बैठकीत आक्रमक होते. सदस्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. 

राष्ट्रवादीचे चौदा आणि स्वाभिमानी घोरपडे गटाचे दोन सदस्य बैठकीस उपस्थित होते. मनोज शिंदे, ॲड. बाबासाहेब मुळीक, शहर जिल्हाध्यश्र संजय बजाज, हणमंत देसाई, दत्तात्रय पाटील, हणमंतराव पाटील, गणपती सगरे, सुरेश पाटील उपस्थित होते. सर्व सदस्यांची मते विचारात घेऊन निवडी जाहीर करण्यात आल्या. 

आमदार पाटील म्हणाले, ‘‘निवडलेले दोन्ही सदस्य जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर लढतील. जिल्ह्यात यंदा तीव्र पाणीटंचाईची परस्थिती निर्माण झाली आहे. लोक पाण्यासाठी टाहो फोडताहेत, जिल्हा प्रशसान मात्र टॅंकर देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. जलयुक्त शिवाय योजनांतून पाणीसाठ्यांतून पाणी साचले, असा प्रशासन आणि शासनाचा समज झाला आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती गंभीर आहे. जिल्ह्यात कालबाह्य झालेल्या अनेक पाणी योजना आहेत. त्यातून लोकांना पाणी मिळत नाही. मी आणि आमदार सुमन पाटील पाणीप्रश्‍नांवर विधानसभेत आवाज उठवणार आहे. गटनेता आणि प्रक्षप्रतोदांचे वेगवेगळे काम आहे.’’ गटनेते श्री. लाड व पक्षप्रतोद श्री. पाटील यांनी निवडीनंतर सांगितले, की पक्षाने दिलेल्या संधीचा आम्ही जिल्ह्यातील जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पुरेपूर उपयोग करणार आहे. 

Web Title: ncp group chairman sharad lad