भाजपमधून राष्ट्रवादीत इनकमिंग; पिचड यांच्याविरोधात लढणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी आज मुंबईत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे याच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश व उमेदवारीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. याबाबत ते पाच ते सहा दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

अकोले - भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी आज मुंबईत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे याच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश व उमेदवारीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. याबाबत ते पाच ते सहा दिवसांत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडल्यानंतर आज डॉ. लहामटे यांनी "राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व प्रदेश सचिव बाळासाहेब जगताप यांच्या समवेत अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. या वेळी पवार म्हणाले, 'आपण अकोले तालुक्‍यासाठी भरपूर काही दिले. पिंपळगाव खांड धरण आपणच नियमात बसवून केले. "निळवंडे'ला निधी दिला, तरीही पिचड यांनी पक्ष का सोडला, हे सांगता येत नाही.'' 

डॉ. लहामटे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशास पवार यांनी अनुकूलता दर्शविली. "आपण पिचड यांना पराजित करण्यासाठी तयार असून, त्यासाठी "राष्ट्रवादी'त येण्यासही तयार आहे. मात्र, पाच ते सहा दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ आणि जाहीर पक्षप्रवेश करू,`` असे लहामटे यांनी सांगितल्याचे समजते.
 
लहामटे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही भेट घेतली. या भेटींमुळे विधानसभा निवडणुकीत पिचड यांच्या विरुद्ध लहामटे "राष्ट्रवादी'चे उमेदवार असतील, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Incoming in BJP Politics Madhukar Pichad Vaibhav Pichad Dr Kiran Lahamate