
जयंत पाटील म्हणाले की, आधीपासून सांगत होतो, थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे, पोलिसांचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे.
सांगली : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले. संबंधित महिलेने मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच झाडाचे पान का पडले म्हणूनही भाजपा आंदोलन करु शकते, असा खोचक टोला लगावला. वाळवा तालुक्यातील कुरळप इथे पी आर पाटील यांच्या अमृत महोत्सव सत्कार कार्यक्रमानंतर पाटील बोलत होते.
हेही वाचा- Video : देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई निष्फळ ; अण्णा हजारे उपोषणावर ठाम
जयंत पाटील म्हणाले की, आधीपासून सांगत होतो, थोडा वेळ जाऊ दिला पाहिजे, पोलिसांचा तपास पूर्ण व्हायला पाहिजे, सरकारला बदनाम करण्यासाठी, वातावरणात निर्मिती करण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी, भाजपने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसेच "झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजपा आंदोलन करु शकते, पण आम्ही त्याकडे फारसे लक्ष देत नाही," असा टोला मंत्री पाटील यांनी यावेळी लगावला.
संपादन- अर्चना बनगे