esakal | जोशी वडापावही 15 रुपयांना मिळतो, मग जेवण... : भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

Chagan Bhujbal

राफेल विमानावरून देखील सरकारला टीकेचे लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी 1 विमान आणले तर ते आणताना त्याची पूजा करून चाकाखाली लिंबू ठेवले. जर आपले रक्षण करायला राफेल आणि राफेलचे रक्षण करायला लिंबू असेल तर मग बॉर्डरवर लिंबच बांधा.

जोशी वडापावही 15 रुपयांना मिळतो, मग जेवण... : भुजबळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कर्जत : शिवसेनेने 10 रुपयांत तर भाजपने 5 रुपयात जेवण देण्याची घोषणा केली. मात्र साधा जोशी वडापाव 15 रुपयाला मिळतो. मग तुम्ही जेवण कसे देणार. फक्त बोलायचे असेल तर आम्ही फुकट जेवण देतो असे म्हणतो. शेतकऱ्यांना रडवल्याने ही वेळ सरकारवर आली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची सभा पार पडली. जामखेड मधील नान्नज येथे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी ही सभा घेण्यात आली. या सभेसाठी नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केली ङोती. कर्जत जामखेड मतदार संघात रोहित पवारच निवडून येईल असा विश्वास यावेळी छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना भाजप आणि शिवसेना सरकार देखील टीका केली.

भुजबळ म्हणाले, की राफेल विमानावरून देखील सरकारला टीकेचे लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी 1 विमान आणले तर ते आणताना त्याची पूजा करून चाकाखाली लिंबू ठेवले. जर आपले रक्षण करायला राफेल आणि राफेलचे रक्षण करायला लिंबू असेल तर मग बॉर्डरवर लिंबच बांधा. भुजबळ यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावरून देखील शेतकऱ्याचे उदाहरण देत सरकारवर निशाण साधला. ज्याप्रमाणे सरकारने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज आणि कागदपत्रे मागितली तशी आता मत देताना देखील ऑनलाइन अर्ज भरा, सर्व कागदपत्रे आणा आणि मग तत्वतः मत द्या.