Vidoe: ‘राजे चाललेच नाहीत, तर त्यांना अडवणार कसे?’; पाहा कोणी केली टीका

ncp leader jayant patil
ncp leader jayant patil

इस्लामपूर : ज्या उदयनराजे भोसले यांना सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचा विरोध डावलून राष्ट्रवादीतून खासदार केले. त्या उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. ‘राजे, तुम्हीसुद्धा?’ एवढे बोलून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षबदलाच्या मानसिकतेवर खेद व्यक्‍त केला.

काय म्हणाले जयंत पाटील?
साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांनीही दिल्लीमध्ये जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला. यावर आज जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, "राजे, तुम्हीसुद्धा?', अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रदेशाध्यक्ष पाटीलल म्हणाले, ‘उदयनराजेंना सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार व पदाधिकाऱ्यांचा असणारा विरोध डावलून शरद पवार यांनी खासदारकीची उमेदवारी दिली. त्यांना निवडून आणले. त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश करावा, हे विशेषच आहे.’  पक्षप्रवेश करताना उदयनराजे यांनी माझी राष्ट्रवादीत अडवणूक झाली, असा आरोप केला होता. यावर जयंत पाटील म्हणाले, ‘अडवणूक करायला त्या व्यक्‍तीने पक्षात काम करायचे असते, पुढे जायचे असते. त्यांनी चालायला तर पाहिजे, ते चाललेच नाहीत तर, त्यांना अडवण्याचा प्रश्न येतो कुठे? उदयनराजे कुठेही पक्षासाठी फिरले नाहीत. त्यामुळे हा आरोप आश्‍चर्यकारक आहे. सातारची जागा पुन्हा निवडून आणण्यासाठी आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन योग्य तो निर्णय घेऊ.’

‘उमेदवार बदलले नाहीत’
लोकसभा निवडणुकीच्या आधी सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उमेदवार बदला, असे सांगत होते. पण, पक्षाने कार्यकर्त्यांचे ऐकले नाही. ही पक्षाची चूक होती, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com