राष्ट्रवादीत कामाची कदर नाही; रश्मी बागल शिवसेनेत?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादीचे पक्षनेतृत्व कामाची कदर करत नसल्याने पक्ष सोडणार असल्याचे रश्मी यांनी सांगितले, अशी माहिती त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी दिली आहे. येत्या सोमवारी (ता. 19) रश्मी यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत पुढील माहिती देतील

पंढरपूर : राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते शिवसेनेच्या वाटेवर असताना, आता आणखी एका नावाची चर्चा होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या तरूण नेत्या रश्मी बागल याही लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

राष्ट्रवादीचे पक्षनेतृत्व कामाची कदर करत नसल्याने पक्ष सोडणार असल्याचे रश्मी यांनी सांगितले, अशी माहिती त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी दिली आहे. येत्या सोमवारी (ता. 19) रश्मी यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत पुढील माहिती देतील.

रश्मी बागल यांची पक्षाला सोडचिठ्ठी हा सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा धक्का असणार आहे. लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने डावलल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Rashmi Bagal possibility to enter Shivsena