आबांचा वारसदार पहिल्यांदाच बारामतीच्या गोविंदबागेत! (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

विरोधक नाही असं सत्ताधारी म्हणत असतानाही राज्यात चांगला निकाल लागला. अर्थात हे सगळं पवार साहेबांमुळं शक्य झालंय : रोहित पाटील

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दरवर्षी दिवाळी पाडव्याला कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या शुभेच्छा स्वीकारतात. यावर्षी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटीलही यंदा गोविंद बागेत उपस्थित होते. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल रोहित पाटील म्हणाले, 'महाराष्ट्र ही वेगळ्या विचारांची भूमी आहे. चांगल्या विचारांची भूमी आहे. त्यामुळेच विरोधक नाही असं सत्ताधारी म्हणत असतानाही राज्यात चांगला निकाल लागला. अर्थात हे सगळं पवार साहेबांमुळं शक्य झालंय.'

कोथरूडमधील बहिणींना साड्या वाटणारच : चंद्रकांत पाटील 

बारामतीच्या गोविंदबागेत आवाज राष्ट्रवादीचा (व्हिडिओ)

चर्चा दोन रोहितची
पहिल्यांदाच बारामतीमध्ये आलो आहे. साहेबजे मार्गदर्शन करतील त्यावर युवक पुढे जात आहे. पहिल्यांदाच बारामतीमध्ये आलो याहे. याचा आनंद असल्याची प्रतिक्रियाही रोहित पाटील यांनी दिली. शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांनी बारामतीत गर्दी केली होती. यात रोहित पाटीलही खास सांगलीहून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवारही उपस्थित होते. शरद पवार यांनी रोहित पवार आणि रोहित पाटील दोघांसोबत फोटो काढले. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्यातील दोन रोहित, अशी चर्चा गोविंदबागेत सुरू होती.

2024ची उमेदवारी जाहीर
विधानसभा निवडणुकीत आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी तासगाव मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तत्पूर्वी, आर. आर. पाटील यांच्या स्मारकाच्या उद् घाटन प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 2024च्या विधानसभेची उमेदवारी आताच जाहीर करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील तासगावमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader rohit patil visits baramati first time diwali festival