राष्ट्रवादीचे नेते विजय सगरे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

सांगली :  कवठेमहांकाळ येथील श्री महांकाली उद्योगसमूहाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते विजय सगरे (वय 54) यांचे पुण्यात रुबी हॉस्पिटलमध्ये आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कवठेमहांकाळ शहरासह तालुक्‍यात शोककळा पसरली असून सहकारातील एक नेतृत्व हरविल्याची भावना व्यक्‍त होत आहे.

महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांना काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेव्हा मागील आठवडयात त्यांच्या तब्येतीत सुधारणा होती. मात्र रविवारी (ता.20) अचानक प्रकृती गंभीर झाल्यामुळे अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत होते.

दरम्यान सोमवारी (ता.21) सकाळी साडे दहाच्या सुमारास सगरे यांचे निधन झाले. कवठेमहांकाळमधील व्यापारी पेठ बंद झाली. कारखान्यावरील नाना भवनात कार्यकर्त्यानी गर्दी केली होती. सहकारातील ज्येष्ठ दिवंगत नेते नानासाहेब सगरे यांचे विजय ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, मुलगा व धाकटे बंधू जिल्हा बॅंकेचे संचालक गणपती सगरे असा परिवार आहे.

Web Title: NCP leader Vijay Sagre dies