Loksabha 2019 : मोदींच्या मंचावर विजयसिंह मोहिते-पाटील; राष्ट्रवादीला धक्का

मनोज गायकवाड 
बुधवार, 17 एप्रिल 2019

माढा आणि बारामती मतदार संघात आज मोदींची सभा होणार आहे. मोदींचे आगमन होण्यापुर्वी येथे मान्यवरांची भाषणे सुरु झाली आहेत. दरम्यान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे मंचावर आगमण झाले आहे. खासदार मोहिते-पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला हात उंचावून अभिवादनकेले त्याला उपस्थितांनी ही मोठी दाद दिली.

अकलूज : माढा मतदारसंघात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या मंचावर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी हजेरी लावून आज राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय धक्का दिला आहे.

माढा आणि बारामती मतदार संघात आज मोदींची सभा होणार आहे. मोदींचे आगमन होण्यापुर्वी येथे मान्यवरांची भाषणे सुरु झाली आहेत. दरम्यान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे मंचावर आगमण झाले आहे. खासदार मोहिते-पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला हात उंचावून अभिवादनकेले त्याला उपस्थितांनी ही मोठी दाद दिली.

यावेळी मंचावर बारामती मतदार संघातील उमेदवार कांचन कुल, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सुधाकर परिचारक, शहाजी पाटील, उत्तम जानकर आदी मान्यवर उपस्थित आहेत. यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप येळगावकर म्हणाले, माढ्यातील मतदारांनी सोशल मिडीयातून उठवलेल्या आवाजाला घाबरुन शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. येथील उद्रेक पाहून पवार माढ्यातून पळून गेले आहेत. आता माढा आणि बारामतीमध्ये भाजपच्या उमेदवाराचा विजय होणार आहे. शिवसेनेच्या आमदार निलम गोरे यांनी एनडीए च्या मंचावर प्रथमच उपस्थित आसलेल्या खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे स्वागत केले.

थोड्याच वेळात यृथे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे आगमण होईल आणि त्यानंतर मुख्य सभा सुरु होणार आहे.

Web Title: NCP leader VijaySingh Mohite Patil present at PM Narendra Modi rally in Akluj