'विकासासाठी १ रुपया जरी आणला असाल तर...'

भुयारी गटार योजनेवरून काल नगरपालिकेत झालेला आत्मदहन व गोंधळाचा प्रकार घडला.
'विकासासाठी १ रुपया जरी आणला असाल तर...'
Summary

भुयारी गटार योजनेवरून काल नगरपालिकेत झालेला आत्मदहन व गोंधळाचा प्रकार घडला.

इस्लामपूर : शहराच्या विकासासाठी विकास आघाडीने एकही चांगले काम केले असेल आणि शासनाकडून एक रुपया जरी आणला असेल तर त्यांनी गांधी चौकात व्यासपीठावर येऊन सिद्ध करावे, असे जाहीर आव्हान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आले. भुयारी गटार योजनेवरून काल नगरपालिकेत झालेला आत्मदहन व गोंधळाचा प्रकार हा इस्लामपूर शहराची अब्रू वेशीवर टांगण्याचा प्रकार असल्याने ते निषेधार्ह असल्याचे मत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.

उपनगराध्यक्ष दादासो पाटील म्हणाले, "एसटीपीच्या जागा ताब्यात घेऊन मगच योजनेचे काम करण्यासाठी आम्ही आग्रही होतो. आम्ही काहीतरी काम करतोय हे जनतेला दाखवण्यासाठी विषयपत्रिकेत नसलेले विषय घेऊन वारंवार दंगा करण्याचा प्रयत्न विकास आघाडीच्या नेत्यांनी केला. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न नागरिकांच्या लक्षात आला आहे."

'विकासासाठी १ रुपया जरी आणला असाल तर...'
इस्लामपुरात 'त्या' नगरसेवकांच्या निलंबनाची मागणी नगराध्यक्षांनी फेटाळली!

राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे म्हणाले, "आम्ही केलेली निलंबनाची मागणी तांत्रिक बाबी पुढे करून नाकारली असली तरी आम्ही पाठपुरावा करू. कोणतीही मागणी करताना त्याला वैचारिक कायदेशीर आधार असावा. पेटवून घेतो, वरून उडी मारतो असे प्रकार अशोभनीय आहेत. इतिहासात असे प्रकार घडले नव्हते. गेल्या पाच वर्षात त्यांनी विकासाचे कोणतेही ठळक काम केले नाही. ते न केल्यामुळे भुयारी गटार योजनेच्या नावावर आपले आपले अपयश झाकण्याचा ते प्रयत्न करत आहेत. शिवसेना आणि विकास आघाडी यांच्यात आपापसात ताळमेळ नसल्याने सभाग्रहात निव्वळ दंगा करून यांनी कार्यकाल संपवला."

शहाजी पाटील म्हणाले, "एसटीपीच्या जागेसाठी समिती नेमली; मात्र एकही बैठक घेतली नाही. नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे भुयारी गटार योजना रखडली. जनतेला यांच्या भूलथापा समजल्या आहेत. आज बंद पुकारून शेतकरी, व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय आणून त्यांनी काय मिळवले? भुयारी गटार योजनेसाठी त्यांनी नेमका कोणता पाठपुरावा केला हे जनतेसमोर येऊन जाहीरपणे सांगावे. ऍड. चिमण डांगे म्हणाले, "विकास आघाडीने पाच वर्षात आपले अपयश लपवण्याचाच एकमेव उद्योग केला. कालच्या प्रकाराने शहराचे नाव राज्यभर बदनाम केले. राष्ट्रवादीने सत्ता असताना स्वच्छता अभियानात वारंवार बक्षिसे मिळवली मात्र गेल्या पाच वर्षात यांना साधे यादीतही नाव आणता आले नाही इतकी वाईट अवस्था शहराची करून ठेवली आहे."

'विकासासाठी १ रुपया जरी आणला असाल तर...'
थंडीच्या दिवसांत तिळाचे लाडू खा अन् तंदुरुस्त रहा

खंडेराव जाधव म्हणाले, "आत्तापर्यंत विकास आघाडीच्या सत्तेत झालेले सर्व ठराव बेकायदेशीर आहेत. आतापर्यंत कोणत्याच मुख्याधिकाऱ्यांना कसलेही स्वातंत्र्य दिले नाही आणि आता कार्यकाल संपताना त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. विषयपत्रिकेतील विषयावर चर्चा करणारी एकही मीटिंग झाली नाही. सभागृहात भाषणबाजी करून, वेळ घालवून जनतेची दिशाभूल केली. शहराला वेठीस धरले." यावेळी विश्वनाथ डांगे, आनंदराव मलगुंडे, सदानंद पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com