राष्ट्रवादीचा 'हा' आमदार म्हणताेय मी 50 काेटींच्या फाेनची वाट पाहताेय...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या व्टीटमध्ये म्हटले आहे की, मी फोनची वाट बघतोय.....? पण कुणी फोन करतचं नाही...शेवटी निष्ठा आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्यावर ! अशा प्रकारचे व्टीट करत त्यांनी भाजपला टाेला मारला आहे.

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तेचा तिढा 15 दिवस उलटूनही सुटलेला नाह. अद्यापही भाजप-सेनेत वाद सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते अजूनच पेटले आहेत.    मागील दाेन दिवसांपुर्वी शिवसेनेच्या एका आमदाराला फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला हाेता. वडेट्टीवार यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली हाेती. यावरून आज वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी व्टीट करत याबाबत भाजपला टाेला मारला आहे.

दरम्यान, वाईचे राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी आपल्या व्टीटमध्ये म्हटले आहे की, मी फोनची वाट बघतोय.....? पण कुणी फोन करतचं नाही...शेवटी निष्ठा आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्यावर ! अशा प्रकारचे व्टीट करत त्यांनी भाजप करत असेलेल्या घाेडेबाजाराबाबत आपले मत मांडत भाजपला टाेला मारला आहे.

वडेट्टीवार काँग्रेसच्या काही आमदारांनाही भाजपकडून फोन येत असून, त्यांना फोडण्याचा प्रयत्न हाेत आहे. मात्र, आमचे आमदार सुरक्षित असून, आमचा कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला हाेता.

याच दरम्यान, इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनीही आपल्याला फोन आल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिली हाेती. आपल्याला काही कार्यकर्त्यांचे फोन आले, काही कार्यकर्ते आपल्या घरीही आले, मात्र मी घरी न थांबता बाहेर निघून गेलो. हे कोण कार्यकर्ते होते आणि ते कशासाठी आले होते, याचा अंदाज सर्वांनाच आहे, असे सांगत भाजपने आपल्याला वळवण्यासाठी प्रयत्न केल्याचे खोसकर यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले हाेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP mla Makrand Patil criticize bjp