VIDEO : शिवेंद्रसिंहराजेंकडून भाजप प्रवेशाचे संकेत

महेश बारटक्के
सोमवार, 29 जुलै 2019

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुडाळ येथे आज (सोमवार) सायंकाळी एका कार्यक्रमा निमित्त आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांना गाठून भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबाबत छेडले. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी "वेट ऍन्ड वॉच' असे म्हटले.​

कुडाळ (ता. जावळी) ः आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कुडाळ येथे आज (सोमवार) सायंकाळी एका कार्यक्रमा निमित्त आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांना गाठून भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबाबत छेडले. त्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी "वेट ऍन्ड वॉच' असे म्हटले.

पुण्यात रविवारी (ता.28) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीतच आहेत असे स्पष्ट केले होते. त्यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले माझे वडील पवार साहेबांच्या बरोबर राजकारणात होते.

आमच्या राजकीय कारकिर्दीत साहेबांचे योगदान आहे. परंतु देशातील व राज्यातील सद्यपरिस्थितीचा विचार करता पूढे काय होणार याचा ही आम्हांला विचार करणे आवश्‍यक आहे. माझ्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. त्यापुर्ण होणे आवश्‍यक आहे. अन्यथा मी देखील काम करीत नाही असे जनतेचे मत होईल. माझ्या मतदारसंघाचा जेथे फायदा असेल तसा मी निर्णय घेईन असे शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Shivendrasinghraje Bhosale may be enter BJP