राष्ट्रवादी पक्ष नव्हे, लुटारुंची टोळी - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

इस्लामपूर - राष्ट्रवादी पक्ष नाही तर ती लुटारुंची टोळी आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. मर्दवाडी, कोळे, नरसिंहपूर, शिरटे, येमच्छिंद्र, लवंडमाची, बेरडमाची, किल्लेमच्छिंद्रगड येथे त्यांचा दौरा झाला. साखराळे येथे सभा झाली. 

ते म्हणाले,""राष्ट्रवादी आणि घोटाळा हे समीकरण घट्ट आहे. इस्लामपुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजाराची जागा सत्ताधाऱ्यांनी हडप केली आहे. मुंबईतील आदर्श घोटाळ्याप्रमाणे बाजार समितीतील दोषींवर कारवाई करून, सत्तेतील पुढाऱ्यांनी विळा, खुरपं, ताडपत्री खरेदी, सायकल वाटपात पैसे खाल्ले. यावेळच्या निवडणुकीत विकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी करा.'' 

ते म्हणाले,""रेठरेधरण, कासेगाव, नेर्ले येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नातेवाइकांना उमेदवारी दिली. ही घराणेशाही नाही का? मग मी मुलाला उभे केले तर माझ्यावर टीका करण्याचा त्यांना हक्क आहे का?'' 

Web Title: ncp party thieves gang