Video : पत्रकार परिषदेत असे भडकले शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पद्मसिंह पाटील आपले नातेवाईक आहेत. तेही पक्षांतर करणार आहेत अशा चर्चा असल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या एका पत्रकाराने पवार यांना पत्रकार परिषदेत विचारले...

श्रीरामपूर (नगर) : माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या संभाव्य पक्षांतरावरून पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आज चांगलेच संतापले. राजकारणात नातेगोते पाहात नाही, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पद्मसिंह पाटील आपले नातेवाईक आहेत. तेही पक्षांतर करणार आहेत अशा चर्चा असल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या एका पत्रकाराने पवार यांना पत्रकार परिषदेत विचारले. 

पवार यांना प्रश्नाचा रोख आवडला नाही. नात्याचा संबंध काय, असे विचारत त्यांनी पत्रकार परिषदेतून उठून जाण्याची तयारी केली. काही ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकार परिषेदत पूर्ण करण्याची विनंती पवार यांना केली. संबंधित पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर जाण्याची विनंती स्थानिक पत्रकारांनी केली. त्यानुसार, संबंधित पत्रकार बाहेर गेल्यावर पत्रकार परिषद पुन्हा सुरू झाली. 

त्या आधी 'राजकारणात नातेगोते पाहात नाही. पद्मसिंह मित्रही आहेत...', असे उत्तर पवार यांनी या प्रश्नावर दिले. 

पवार नगर जिल्ह्याच्या दौऱयावर आहेत. काल त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातील उपक्रमांची पाहणी केली. आज रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी ते श्रीरामपूरमध्ये होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP president Sharad Pawar gets angry on Press Conference