'संजय घाटगेंच्या घराणेशाहीला सुरुंग लावा '

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

म्हाकवे - पंचायत समितीमधील संजय घाटगेंच्या घराणेशाहीला स्वाभिमानी जनताच सुरुंग लावेल. अंबरिश घाटगेंचा पराभव करूनच स्वाभिमानी कार्यकर्ते शांत बसतील, असा विश्‍वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केला. 

बानगे (ता. कागल) येथे पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार के. पी. पाटील होते. या वेळी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रवींद्र पाटील, राजाराम पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संजय घाटगे गटातून मुश्रीफ गटात प्रवेश केला. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, ""संजय घाटगेंच्या शब्दकोशात कपट, लबाडी आणि विश्‍वासघात हे शब्द ठासून भरले आहेत. या निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण योग्य झाल्यास आमच्या उमेदवारांना निवडून येण्याची नामी संधी आहे. बेरोजगारांना काम देण्यासाठी इंडो काऊंटसारखा प्रकल्प हाती घेणार आहे.'' 

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, ""प्रत्येक निवडणुकीत नवा पाहुणा शोधून सत्ता स्थापन करणाऱ्याची मक्तेदारी मोडून काढा. याची सुरवात बानगे गावातून झाली आहे. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर या निवडणुकीत मुश्रीफ चक्रव्यूह निश्‍चित भेदतील.'' 

प्रवीणसिंह पाटील यांनी आमच्या भावांमध्ये मतप्रवाह निर्माण झाल्यानंतर जातीयवादी पक्षाची पाठराखण करणार नसल्याचा निर्धार केला. मुरगूड शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मुश्रीफांनी दिला. यामुळेच त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रास्ताविक शेखर सावंत यांनी केले. या वेळी भैया माने, गोरंबेचे सरपंच शिवाजी पाटील, प्रवीणसिंह भोसले, सुरेश लंबे, राजाराम पाटील, उमेदवार वृषाली रवींद्र पाटील, राजेंद्र शिवाजी पाटील (बारामती) यांनी मनोगत व्यक्त केले. ए. वाय. पाटील, युवराज पाटील, गणपतराव फराकटे, नाविद मुश्रीफ, माणिक माळी, शिवानंद माळी, सिद्राम पाटील, रमेश पाटील, दत्ता पाटील - केनवडे, मोहन पाटील, संतोष पाटील, विलास पाटील, धनाजी पाटील, संजय कदम, राजू बारवेकर, मनोज फराकटे, अंकुश पाटील, जे. डी. मुसळे आदी प्रमुख उपस्थित होत. विकास पाटील यांनी आभार मानले. 

बिद्रीकडे नजरा नकोत 
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, ""कागलमधील संजय घाटगेंना बिद्रीचं याड लागले आहे. त्यांचा काही संबंध नसताना ते बिद्रीकडे पाहत आहेत. पण त्यांना माहीत नाही, बिद्रीची चिमणी 85 मीटर उंचीची असल्याने तुमच्या नजरा तिथंपर्यंत पोचणार नाहीत. कारखान्याची परिस्थिती चांगली असून आम्ही तेथे असतो तर पहिली उचल तीन हजार आणि अंतिम दर तीन हजार पाचशे रुपये दिले असता.''

Web Title: NCP promotion launched