गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादीची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - केंद्र शासनाने केलेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर जिल्हा युवक राष्ट्रवादीच्यावतीने आज शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी शासनाच्या निषेधार्थ दिलेल्या घोषणांमुळे शिवाजी चौक परिसर दणाणून गेला.

कोल्हापूर - केंद्र शासनाने केलेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापूर शहर जिल्हा युवक राष्ट्रवादीच्यावतीने आज शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी शासनाच्या निषेधार्थ दिलेल्या घोषणांमुळे शिवाजी चौक परिसर दणाणून गेला.

गॅस सिलिंडरच्या दरामध्ये शासनाने जवळपास ८० रुपयांची वाढ केली आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज आंदोलन पुकारले होते. आंदोलनासाठी सकाळपासून या ठिकाणी कार्यकर्ते जमत होते. गॅस दरवाढीच्या तसेच शासनाच्या निषेधार्थ घोषणा या वेळी देण्यात आल्या. गॅसला हार घालून रस्त्यावरच चूल मांडून भाकरी करण्यात आल्या. युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलनात माजी महापौर आर. के. पोवार, महिला शहर अध्यक्ष जहिदा मुजावर, आदिल फरास, युवराज साळोखे, नागेश फराडे, किशोर माने, अनिल कदम, फिरोज सरगूर, निरंजन कदम, आकाश पाटील, अमोल मधाळे, दौलत साळोखे, अंगद कोंडरे, मंगेश माने, विनोद जाधव, इब्राहिम नदाफ, अक्षय अर्जुनगी, आकाश वाघमारे, सचित लोहार, रोहित गवंडी, बबलू काळे, प्रमोद पवार, शीतल तिवडे, जयकुमार शिंदे, सुहास साळोखे, किसन कल्याणकर, रेखा आवळे, भूषण हुंबे, रामेश्‍वर पत्की, आसीफ सय्यद आदी सहभागी झाले होते.

शेकापतर्फे आज निदर्शने
गॅस दरवाढीच्या निषेधार्थ उद्या (ता.१०) सकाळी ११ वाजता बिंदू चौकात निदर्शने करण्यात येणार आहेत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे पत्रक शहर चिटणीस बाबूराव कदम यांनी दिले आहे.

Web Title: NCP protests