आंबेडकरांना सामावून घेण्यास तयार - तटकरे

आंबेडकरांना सामावून घेण्यास तयार - तटकरे

पंढरपूर - ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात सर्व मित्र पक्षांना एकत्रित करून महाआघाडी केली जाणार आहे. या महाआघाडीमध्ये ॲड. प्रकाश आंबेडकरांना सहभागी करून घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल आहे,’ असे ‘राष्ट्रवादी’चे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज म्हणाले. 

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सुनील तटकरे आज दुपारी विठ्ठल दर्शनासाठी आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तटकरे म्हणाले, ‘‘देशात व राज्यात भाजप सरकारविरोधात लोकांमध्ये आक्रोश आहे. त्यामुळे देशात व राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. लोकांना परिवर्तन हवे आहे. महाआघाडीच्या माध्यमातून समविचारी पक्षांना एकत्रित करून सक्षम पर्याय देण्याचा विचार सुरू झाला आहे. महाआघाडीमध्ये सर्व नाराज आणि मित्रपक्षांना सामावून घेतले घेणार आहे. यासदर्भात एक बैठकदेखील झाली आहे. लवकरच डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांचेही मतपरिवर्तन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.’’

शिवसेनेच्या भूमिकेविषयी विचारले असता तटकरे यांनी, राजकारणात दुटप्पी भूमिका घेण्याचा शिवसेनेने कळस गाठला आहे, शिवसेनेकडून अपेक्षा करण्याचे दिवस संपून गेले असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com